आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाला ‘पांडुरंग’ पावला; डीपीसीतून साडेचार काेटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत फारशा अपेक्षा नसलेल्या महापालिकेला रविवारची बैठक अनपेक्षित लाभदायी ठरली. पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी त्यांच्या पहिल्याच बैठकीत महापालिकेला काेटी ३४ लाखांचा निधी मंजूर केला. त्यात मेहरूण तलावासाठी काेटी, शाैचालयांसाठी ५० लाख रुपये, तर दलित वस्ती सुधार कार्यक्रमासाठी काेटी ८४ लाख रुपये देण्याची घाेषणा केली. शहरातील गरजांसाठी वारंवार सरकार दरबारी चकरा मारणाऱ्या पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने ‘पांडुरंग’ पावल्याचे चित्र निर्माण झाले अाहे. त्यामुळे त्यांचे कृपाछत्र यापुढेही कायम राहते का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट हाेईल.
जिल्हा नियाेजन समिती ही ग्रामीण भागासाठी असल्याचे कारण पुढे करत महापालिकेच्या तांेडाला पाने पुसली जायची; परंतु पालकमंत्री फुंडकर यांनी मागता महापालिकेला मेहरूण तलावासाठी काेटी रुपये दिले, तर महापाैर नितीन लढ्ढा अाणि अामदार सुरेश भाेळे यांनी मागणी केलेल्या कामांनाही निधी जाहीर केला. शहरातील शाैचालयांसाठी ५० लाख, तर दलित वस्ती सुधार कामांसाठी काेटी ८४ लाख रुपयांचा निधी जाहीर केला. शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याने रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाेबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निधीची मागणी करू, असे अाश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. ‘नगराेत्थान’ याेजनेतून गणेश काॅलनी चाैक ते काेर्टदरम्यान विजेचे पाेल स्थलांतरित करण्याच्या तसेच इच्छादेवी ते शिरसाेली नाकादरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी निधी मिळवून देण्याचे अाश्वासन त्यांनी दिले.

वाघनगरपरिसराच्या पाण्याची समस्या लवकरच साेडवणार
वाघनगर येथील पाणीपुरवठा याेजना वेळेत पूर्ण करण्याचे अाश्वासन देत यासाठी मुंबईत बैठक लावून समस्या साेडवण्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. अामदार सुरेश भाेळे यांनी इतर समस्यांप्रमाणे स्मशानातील लाकडांसाठी निधी देण्याची मागणी केली. त्यावर ही कामे महापालिकेनेच करावी, अशी सूचना त्यांनी केली. अायुक्त जीवन साेनवणे यांनी यावर स्पष्टीकरण देत अाॅडिटचा विषय क्लीअर झाल्याने यापुढे लाकडांची व्यवस्था करता येणार असल्याचे सांगितले. यापूर्वीच्या डीपीसीच्या बैठकांमध्ये ग्रामीण भागाला प्राधान्य देत पालिकेच्या ताेंडालापाने पुसली जायची; परंतु पहिल्यांदाच चांगला निधी मिळाला अाहे. याबाबत व्यासपीठावरच महापाैर लढ्ढा अाणि अामदार भाेळे यांनी पालकमंत्र्यांचे अाभार मानले.

महापाैर,अामदारांचा एक सूर
शहरातील राजकारण त्यातून मतभेद असलेले खान्देश विकास अाघाडीचे महापाैर नितीन लढ्ढा अाणि अामदार सुरेश भाेळे यांनी जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत एका सुरात शहरातील समस्यांचा पाढा वाचत निधी मिळवण्याचा प्रयत्न केला. दाेघांनीही एकमेकांच्या सुरात सूर मिसळला, तर स्थायी समिती सभापती नितीन बरडेंनीही तीच री अाेढली. यात स्मशानात लाकडे पुरविण्याचा विषय साेडल्यास सर्वच विषयांवर पालकमंत्र्यांनी गांभीर्य दाखविले.

धार्मिक स्थळाचा दर्जा मिळणार
महापाैर लढ्ढा यांनी अायत्या वेळेच्या विषयात मेहरूण तलाव, शिवाजी उद्यानाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळावा. तसेच सिंधी काॅलनीतील सिंधी समाजाच्या समाधिस्थळाला धार्मिक स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी ठराव मांडला. त्याला मंजुरी देण्यात अाल्याने अाता राज्य शासनाच्या माध्यमातून त्याची घाेषणा केली जाऊ शकते.

२५ काेटींच्या अाशा पल्लवित
२५ काेटींसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची घाेषणा शहरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अाहे. पालकमंत्री फुंडकर यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाेबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे या वेळी जाहीर केले. त्यामुळे २५ काेटींच्या निधीबाबत मावळलेल्या अाशा पुन्हा पल्लवित झाल्या अाहेत.

पालकमंत्र्यांकडून याच अपेक्षा हाेत्या
^पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जळगाव शहराच्या दृष्टीने सकारात्मकता दाखवत साडेचार काेटींचा निधी जाहीर केला. विशेष म्हणजे, शहरातील रस्त्यांसाठी २५ काेटींचा निधी मिळावा म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांसाेबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे अाश्वासन दिले. अामदार सुरेश भाेळे, खासदार ए. टी. पाटील तसेच सभापती बरडेंनी शहरासाठी भूमिका मांडल्याने शहराचे चित्र बदलेल, अशी अाशा अाहे. पालकमंत्र्यांकडून याच अपेक्षा हाेत्या. नितीन लढ्ढा, महापाैर, महापालिका
बातम्या आणखी आहेत...