आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत एकेरीत पंकज पवार विजेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जैन इरिगेशनचे यशस्वी खेळाडू अनिल मुंडे, पंकज पवार, योगेश धोंगडे.)
जळगाव- नरसोबावाडी जि. कोल्हापूर येथे झालेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत एकेरी पुरुष गटात जैन इरिगेशनच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. पंकज पवार हा विजेता ठरला. तर योगेश धोंगडे उपविजेता आणि अनिल मुंडे हा पाचव्या स्थानी राहिला.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशन, दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने नरसोबावाडी जि. कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य पुरुष आणि महिला एकेरी कॅरम स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात जैन इरिगेशनच्या खेळाडूंनी पुन्हा नेहमी प्रमाणे आपले वर्चस्व कायम राखले. यात जैन इरिगेशनचा मुंबईचा खेळाडू पंकज पवार विजेता ठरला. तर योगेश धोंगडे हा उपविजेता ठरला. तसेच जैनचा पुण्याचा खेळाडू अनिल मुंडे हा पाचव्या क्रमांकावर राहिला. महिला एकेरी गटात रत्नागिरीच्या मैत्रेय गोगटे हिने मुंबईच्या प्रिती खेडेकरचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. यशस्वी खेळाडूंचे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक अतुल जैन, फारुख शेख, अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसिन यांनी स्वागत केले.
स्पर्धेतील विजयी खेळाडू
पुरुषगटात अंतिम सामन्यात पंकज पवार याने योगेश धोंगडे याचा १७-१३ आणि २५-०२ असा पराभव केला. एअर इंडिया मुंबईचा रियाज अकबर अली याने पुण्याच्या पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डचा योगेश परदेशी याचा पराभव करून तिसरा क्रमांक प्राप्त केला. तर मुंबईचा दिलीप सोसा, पुण्याचा वसंत वैराळ आणि सुरेख पंडित यांनी अनुक्रमे ते क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. महिला एकेरी गटात कोल्हापूरची शोभा कामत आणि पालघरची आसावरी जाधव यांनी अनुक्रमे तिसरे चौथे स्थान प्राप्त केले.
बातम्या आणखी आहेत...