आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांचे घोटाळे जनतेपर्यंत नेणार- पंकजा पालवे-मुंडे यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर - गेल्या 14 वर्षांपासून राज्यात आघाडी सरकारचे शासन आहे. मात्र, या 14 वर्षांच्या काळात राज्यातील जनतेला वनवास सहन करावा लागला आहे. या मुळे आगामी निवडणुकांमध्ये जनतेचा वनवास संपणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून मंत्र्यांनी केलेले घोटाळे जनतेपर्यंत नेण्यासाठी युवा शक्ती एकवटणार आहे, असे प्रतिपादन भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षा, आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी केले.

कोथळी (ता.मुक्ताईनगर) येथे गुरुवारी आयोजित भाजयुमोच्या एल्गार मेळाव्यात त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. चाळीसगावचे उन्मेष पाटील यांनी मेळाव्यात भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमात पाटील यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. मुक्ताईच्या पावन भूमीत भाजपमध्ये प्रवेश केल्याचा अभिमान आहे. भविष्यात पक्षादेशाचे तंतोतंत पालन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बोदवड, मुक्ताईनगरसह काँग्रेसचे भगवान मोरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, प्रदीपसिंह वाघेला, खासदार हरिभाऊ जावळे, खासदार ए. टी. पाटील, दिलीप खोडपे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, रक्षा खडसे, अँड. रोहिणी खडसे-खेवलकर उपस्थित होते.