आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ट पेपर सादर; जळगावच्या दोघा विद्यार्थ्यांचा गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सीए शाखेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत उत्कृष्ट पेपर सादरीकरणात येथील सीए विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप झाला.
सीए विद्यार्थ्यांना सीए कायद्यामधील झालेल्या बदलांची माहिती व्हावी, या उद्देशातून दोन दविसीय राष्ट्रीय स्तरावरील परिषद घेण्यात आली. या परिषदेसाठी देशभरातून विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. बोर्ड ऑफ स्टडिजचे व्हाइस चेअरमन प्रफुल्ल छाजेड, रिजनल कॉन्सिल मेंबर सुनील पतोडिया, विकासाचे चेअरमन एस.जी. मुंदडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यात पेपर सादरीकरण स्पर्धेत उत्कृष्ट पेपर म्हणून जळगावच्या दोघा विद्यार्थ्यांचा गौरव झाला. यात पूजा असोपा, नेहा भुतडा (जळगाव), ऐश्वर्य जैन (इंदूर), संचित जैन (मुंबई) या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट पेपर प्रेझेंटर म्हणून नविड करण्यात आली. त्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जािलंदर सुपेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी सीए असोसिएशनचे अध्यक्ष जयेश ललवाणी, उपाध्यक्ष कौशल मुंदडा, सचवि नितीन झंवर, अजय जैन, प्रीती मंडोरे, लक्ष्मीकांत लाहोटी, हर्षिद मालपाणी, देवेश खविसरा, अंकित मणियार, अमोल संत, सागर वायकोळे, श्रीकांत बेहेडे आदी उपस्थित होते.

कला गुणांना जोपासा
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुपेकरांनी भावी आयुष्यात यश कसे संपादन करावे, याविषयी अनेक टिप्स दिल्या. ध्येय निश्चित केल्यानंतर ते पूर्ण करण्याची धडपड आणि जिद्द असली पाहिजे. करियरकडे वाटचाल करीत असताना आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा, असे त्यांनी सांगितले.