आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही जुगार नव्हे, रमी खेळत होतो : ललवाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - भुसावळात आम्ही जुगार नव्हे, तर रमी खेळत होतो. परंतु, माझ्याविराेधात राजकीय षडयंत्र रचण्यात आले त्यासाठी पोलिसांचा वापर केला गेला, असा आरोप जामनेरचे नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केला. जुगाराच्या वेळी सापडलेले पैसे भाजपच्या कार्यकर्त्याचे होते, असे त्यांनी सांगितले.

भुसावळात जुगार खेळताना ललवाणींसह आठ जणांना शनिवारी एलसीबीने पकडले होते. त्यानंतर रविवारी ललवाणी यांनी जामनेरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, जुगार खेळताना एक लाख८७ हजार एवढी रक्कम दाखवली. ही रक्कम म्हणजे भाजपच्या एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे दिलेले पैसे होते. आम्ही दुसर्‍या कार्यक्रमानिमित्त हॉटेल तनारिकात गेला होता. तसेच टाइमपास म्हणून रमी खेळत होतो. आमच्याकडे केवळ २७ हजार रुपये होते, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.शरद पाटील, नगरसेवक मुकुंदा सुरवाडे, नगरपालिकेचे गटनेते पिंटू चिप्पड आदी उपस्थित होते. दरम्यान, ललवाणी यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नगरपालिकेतील भाजपचे गटनेते महेंद्र बाविस्कर यांनी केली आहे.

...पण,मंत्र्यांना फोन करणार नाही
भाजप कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी हे पैसे पोलिसांजवळ दिल्याचा मला संशय आहे. त्यांनी लागलीच फोन लावून ‘ललवाणी, तुम्ही भाऊंशी (गिरीश महाजन) बोलून घ्या, नाहीतर तुम्ही दोन दिवस कारागृहातून बाहेर येणार नाही’ असे सांगितले. त्यावर ‘मी कारागृहात राहील. पण, कारागृहातून बाहेर येण्यासाठी आयुष्यात मंत्र्यांना फोन लावणार नाही’ असेही ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.