आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Parbhani Municipal Corporation Commissioner Transfered To Jalgoan Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणीचे आयुक्त जळगाव महापालिकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मराठवाड्यातील परभणी महानगरपालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर यांची जळगाव महापालिकेत बदली करण्यात आली असून या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे.


रात्री उशिरा जळगाव महापालिकेचे आयुक्त संजय कापडणीस यांची बदली झाल्याचे वृत्त शहरात पसरले होते. मात्र, या संदर्भात आपल्याला काहीही माहिती नसल्याचे कापडणीस यांनी सांगितले. तथापि, परभणी महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी आपली जळगाव महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाल्याचे आपल्याला समजले आहे, असे सांगितले. ते दीड वर्षापूर्वी भंडारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदावरून पदोन्नती मिळवून आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत. कॉंग्रेसच्या नगरसेवकांशी झालेल्या वादामुळे ते परभणीत चर्चेत आले होते. परभणीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी त्यांनी घेतलेला पुढाकारही महत्त्वाचा ठरला.