आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parbhani's Nationalist Leader Get Doctorate By North Maharashtra Univeristy

परभणीच्या ‘राष्‍ट्रवादी’ डॉक्टरांसाठी उमविच्या कुलगुरूंची शिफारस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - परभणीच्या एका ‘राष्‍ट्रवादी’ डॉक्टरचा रहिवास चाळीसगावचा दाखवून त्यांची उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) नियुक्ती करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य म्हणून प्रतिनिधी पाठवावे, असे आवाहन राज्यातील विद्यापीठांना करण्यात आले होते. त्यासाठी 10 वर्षांचा वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव ही अट होती. विद्यापीठांनी आपल्या कार्यक्षेत्रातील डॉक्टरची शिफारस करावी अशी अपेक्षा असताना उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांनी चक्क परभणी येथील डॉ. प्रफुल्ल पाटील यांची शिफारस केली आणि त्यानुसार त्यांच्या सदस्यत्वाचे नोटिफिकेशनही जारी झाले.


कुलगुरूंना अधिकार : विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून कोणाला सिनेटवर पाठवायचे याचे अधिकार पूर्णपणे संबधित विद्यापीठांच्या कुलगुरूंना असतात. फक्त डॉक्टरांची 10 वर्षांची प्रॅक्टीस झालेली असावी, अशी अट आहे, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकल यांनी दिली.