आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएमटीयूची पार्किंग ठरतेय डोकेदुखी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जेएमटीयूमुळे सुविधेपेक्षा असुविधाच अधिक होत आहे. गाड्या उभा करण्यासाठी थांबाच नसल्याने रस्त्यावरच पार्किंग केली जात असल्याने अपघात होतात. दुकानासमोर पार्किंग केल्याने दुकानदार आणि चालकांमध्ये होणारे वादही नित्याचेच झाले आहेत. सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून जाणे कठीण झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

जेएमटीयूचा पार्किंगचा प्रश्‍न मार्गी न लागल्यामुळे कोंबडी बाजार ते चित्रा चौक आणि चित्रा चौक ते टॉवर चौकापर्यंतचा परिसर जेएमटीयूने व्यापलेला असतो. भररस्त्यावर इतर वाहनांची पर्वा न करता या गाड्या उभ्या असतात. त्यामुळे इतर मोठी आणि छोटी वाहने अडकून पडतात. पार्किंगच्या मुद्यावरून वाहनधारक आणि जेएमटीयूचे कर्मचारी भांडणातच दिवस काढत असल्याची स्थिती आहे. याला व्यावसायिकही वैतागले आहे.

निश्चित थांबा नसल्याने अडचण
महापालिकेने ठेकेदाराला गाड्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. हा मुद्दा अनेक वेळा पुढे येऊनदेखील जागेच्या मुद्यावर तोडगा न निघाल्यामुळे यापूर्वीच्या कंपनीने जळगावातील सेवा बंद केली होती. अजूनदेखील पालिकेने हा मुद्दा गांभीर्याने घेतलेला नाही. परिणामी गाड्या रस्त्यावरच पार्किंग होतात.

चौकात अपघात
चित्रा टॉकीज चौकाचा उपयोग जेएमटीयूचे चालक गाड्या वळविण्यासाठी करतात. प्रचंड वर्दळ असल्याने या चौकातून वाहने वळविण्यास मनाई असतानादेखील तेथून गाड्या वळविल्या जात असल्याने ट्रॅफिक जामसह अपघातही होत आहेत. गाड्या वळविण्यास वाहतूक शाखेकडून बंदी घालण्याचे प्रयत्न मात्र होत नसल्याने नागरिक वेठीस ठरले जात आहेत.