आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाराेळ्यात कार्यकर्त्यांची पळवापळवी शहरात रंगले राजकीय नाट्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळा : जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकारणाने वेगळेच वळण घेतले अाहे. पक्षाचे प्राबल्य वाढवण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षात अाणले जात अाहे. शनिवारी चक्क राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नगाव येथील माजी सरपंच यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पाठ थाेपटून घेतली. 
 
भाजपच्या कार्यालयात प्रवेश साेहळाही झाला. त्यात राष्ट्रवादीला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले. याबाबत रात्री लगेच राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन तालुकाध्यक्ष यशवंत पाटील दत्तू पाटील राष्ट्रवादीतच असल्याचा खुलासा केला. जबरदस्तीने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. 
 
राष्ट्रवादीचे विद्यमान तालुकाध्यक्ष यशवंत पाटील नगाव येथील माजी सरपंच दत्तू पाटील यांनी भाजपत सकाळी प्रवेश केला. खासदार ए. टी. पाटील यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या प्रवेश सोहळ्याला खासदार पाटील, नगराध्यक्ष करण पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील, भाजप तालुकाध्यक्ष अतुल मोरे, मुकुंद चौधरी, अविनाश पाटील, डॉ. अजित नांदेडकर, सुरेंद्र बोहरा, प्रा.आर. व्ही. पाटील आदी उपस्थित होते. 
 
या वेळी यशवंत पाटील, दत्तू पाटील उंदीरखेडे येथील मंगेश सूर्यवंशी यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. या वेळी खासदार पाटील यांनी म्हसवे गणासाठी दत्तू पाटील यांची उमेदवारी घोषितही केली. यशवंत पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये घुसमट होत असल्याने कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्यानेच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. 
 
रात्री राष्ट्रवादीत परत 
राष्ट्रवादीने शनिवारी रात्री तातडीने पत्रकार परिषद घेऊन पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाबाबत खुलासा केला. त्यात माजी खासदार वसंतराव मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी खुलासा केला, की यशवंत पाटील दत्तू पाटील यांना खासदार ए. टी. पाटील बाळासाहेब पाटील हे स्वत:च्या गाडीत त्यांच्या घरापासून बसवून घेऊन गेले. त्यांना राष्ट्रवादीबाबत चुकीची माहिती देऊन त्यांचा जबरदस्तीने प्रवेश करून घेतला. 
बातम्या आणखी आहेत...