आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळा तालुक्यातील जोगलखेड्यात तरुण शेतकऱ्याची अात्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळा- तालुक्यातील जोगलखेडे येथील तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी कर्ज वसुलीचा सुरू असलेला तगादा या गोष्टींच्या नैराश्यातून अात्महत्या केली. संदीप चुडामण पाटील (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव अाहे. 

जाेगलखेडा येथे मृत शेतकरी संदीप पाटील यांच्याकडे पाच बिघे जमीन होती. या जमिनीत त्यांना मागील तीन वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. शेतीसाठी त्याने विकास सोसायटीचे लाख रुपयांचे कर्ज काढले होते. तर हात उसनवारीचेही त्यांच्यावर कर्ज होते.
 
सततच्या नापिकीमुळे संदीप पाटील हे कर्ज फेडू शकत नव्हते. बँकेचे कर्ज उसनवारीचे पैसे फेडण्यास अपयश आल्याने नैराश्यापाेटी संदीप पाटील यांनी राहत्या घरी सकाळी ११.०० वाजता गच्चीवर जाऊन विषारी औषध सेवन केले. संदीप यांची भावजई कपडे टाकण्यासाठी गच्चीवर गेली असता त्यांना ही घटना लक्षात आली. त्यानंतर संदीप पाटील यांना उपचारासाठी पारोळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, संदीप पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक १६ वर्षांचा मुलगा १४ वर्षांची मुलगी आहे. 
 
अात्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी 
विषारी औषध सेवन करण्यापूर्वी संदीप पाटील यांनी चिठ्ठी लिहून, ती आपल्या खिशात ठेवली होती. या चिठ्ठीत, ‘माझ्याकडे पाच बिघे जमीन असून सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडू शकल्याने मी आत्महत्या करत अाहे. यासाठी माझ्या कुटुंबाला जबाबदार धरू नये’, असे लिहून ठेवले होते. या बाबत अनिल पाटील यांनी पारोळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...