आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंशकालीन शिक्षकांची नियुक्ती अंतिम टप्प्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कला,क्रीडा कार्यानुभवाच्या अंशकालीन शिक्षकांची राज्यभरात जवळपास १० हजार पदे रिक्त आहेत. यावर १५ दिवसांत मार्ग काढण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने २० जुलै रोजी दिले आहेत. त्यामुळे आता शिक्षकांच्या नियुक्तीचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.

शालेय व्यवस्थापन समितीने वर्षांपूर्वी नेमलेल्या अंशकालीन शिक्षकांना शासनाने घरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे या शिक्षकांची उपासमार होत आहे. पावसाळी अधिवेशनात शिक्षकांच्या बाजूने शासन चांगला निर्णय घेईल, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे. वर्षांपूर्वी शालेय व्यवस्थापन समितीने स्वत:च्या अधिकारात हजार शिक्षकांची नियुक्ती केली होती. परंतु, या समिती विरोधात तक्रारी वाढल्यामुळे शासनाने ही सर्व पदे रद्द केली होती. जळगाव जिल्ह्यातही कला, क्रीडा कार्यानुभव या पदांच्या २८३ जागा भरण्यात आल्या होत्या. त्यांना पाच हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले होते. ११ महिन्यांनंतर ही पदे रद्द झाल्याने या शिक्षकांना घरी बसावे लागले. दरम्यानच्या काळात कला (चित्रकला), क्रीडा (आरोग्य) कार्यानुभव (सी.टी.सी.)ची मंजूर पदे त्वरित भरावी, असा निर्णय खंडपीठाने दिला होता. त्यानुसार त्या-त्या जिल्ह्याच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिकारात निवड समितीमार्फत राज्यातून अर्ज मागवण्यात आले होते. तसेच त्यांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादीही जाहीर केली गेली. परंतु, त्यावर यापूर्वी शालेय व्यवस्थापन समितीने ज्या शिक्षकांची नेमणूक केली होती, त्या शिक्षकांनी या निर्णयावर स्थगिती आणली. वर्षांनंतर नवीन समिती गठित करण्यात आली. त्या वेळी झालेल्या निर्णयानुसार या जागा निवड समिती भरणार आहे. त्या जागा गुणवत्तेनुसार भरण्याचा निर्णय २२ जून २०१५च्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मात्र, विविध शिक्षकांच्या संघटनांनी न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या. दरम्यान, जोपर्यंत या याचिका परत घेतल्या जात नाहीत, तोपर्यंत शासन निर्णय घेण्यास राजी नसल्याचे कळते.

न्यायालयाने फटकारले
उच्चन्यायालयात २० जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान शासनाला फटकारले आहे. वारंवार मुदत देऊनही शासनाने हा प्रश्न मार्गी लावला नाही. आता १५ दिवसांच्या आत वा वर्ग जोडून परमनंट (कायमस्वरुपी) पॉलिसी तयार करा. पूर्वी काम केलेल्या अंशकालीन निदेशक पुन्हा शाळेवर कसे जातील, या स्वरुपात माहिती सादर करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

संवर्ग वर्गवारी करणे आवश्यक
शासनाकडूनकधीही ही पदे भरण्यास हिरवा कंदील मिळू शकतो. परंतु, दरम्यानच्या काळात शासनाने कला, क्रीडा कार्यानुभव या पदांचा संवर्ग तयार करणे तसेच बिंदू नामावली तयार करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका महापालिकांनी यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.