आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज विशेष मतदार नोंदणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मतदार याद्या शुद्धीकरण आणि प्रमाणिकरणाची प्रक्रिया नविडणूक आयोगातर्फे सुरू करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यात २८ जून रोजी वशिेष मतदार नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप ज्या मतदारांनी आपली नावे नोंदवले नाहीत किंवा १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांनी आपले नाव त्वरित नोंदविण्याचे आवाहन िजल्हा नविडणूक शाखेने केले आहे.

भारत नविडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३१ जुलै २०१५ पर्यंत राष्ट्रीय मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत निरंतर प्रक्रियेतील फॉर्म ६, ७, आणि ८अ देखील स्वीकारले जातील. या कार्यक्रमांतर्गत मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या डेटाबेसशी मतदाराचा आधार क्रमांक जोडण्यात येणार आहे. दुबार, मयत तसेच स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. छायाचित्र मतदार ओळखपत्रातील चुका दुरुस्त करून प्रमाणित मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. आधार क्रमांक मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या डेटाबेसमध्ये भरण्यासाठी विविध कार्यपद्धतींचा उपयोग करता येणार आहे. विभागाने या आधी १६ एप्रिल, १७ मे रोजी ही मोहीम राबवली होती. आता २८ जूनला ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

असा करा आधार नंबर िलंक आयोगाच्याhttp://eci.nic.in या संकेतस्थळावर मतदाता सेवा पोर्टलवर आधार क्रमांक इतर माहिती भरता येणार आहे. मुख्य नविडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या http://ceo.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील ‘अपलोड युवर आधार’ या लिंकवर माहिती भरता येईल. १६६/५१९६९ या क्रमांकावर ECILINK स्पेस मतदान कार्ड क्रमांक स्पेस आधार क्रमांक याप्रमाणे एसएमएस करता येईल. ई-मेल, नविडणूक आयोगामार्फत तयार करण्यात येत असलेले मोबाइल ॲप आणि १९५० क्रमांकावर कॉल करूनदेखील डेटाबेस भरता येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...