आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचा सल्ला: वयाची पंचाहत्तरी गाठणाऱ्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाेपडा (जि. जळगाव)- ‘माझ्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी वयाची पंचाहत्तरी गाठली अाहे. अाता तिघांनीही राजकारणातून निवृत्त हाेऊन तरुणांना पुढे करून त्यांना ज्येष्ठत्वाच्या नात्याने मार्गदर्शन करावे’, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साेमवारी चाेपड्यात अायाेजित कार्यक्रमात दिला.    
 
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी व चाेपडा पीपल्स बँकेच्या अमृतमहाेत्सवी वर्षानिमित्त अायाेजित कार्यक्रमात पवार बाेलत हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, सामाजिक न्यायमंत्री रामदास अाठवले, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल, कविवर्य ना. धों. महानोर अादी व्यासपीठावर उपस्थित हाेते.   
 
‘पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी घेतलेल्या नाेटाबंदीच्या निर्णयाला समर्थन देऊन अाम्ही पाठिंबा दिला. मात्र, सहा महिने लाेटले तरी काळा पैसा बाहेर काढण्यात सरकारला यश मिळाले नाही. नाेटाबंदीनंतर सहकारी बँकांच्या नाेटा बदलून देण्याची जबाबदारी नाबार्ड व रिझर्व्ह बँकेने घेतली नाही, तर राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेल, अशी स्थिती कुठेच दिसत नाही. गुजराथी हे दूरदृष्टी असलेले नेते अाहेत. विधानसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अापल्या कार्यपद्धतीतून अादर्श ठसा उमटवला अाहे. अांतरराष्ट्रीय राष्ट्रकुल परिषदेत त्यांना भारताची भूमिका मांडण्याची संधी मिळाली हाेती’, असेही पवार यांनी नमूद केले.    
 
अगाेदर बँकेची कुंडली पाहताे    
काेणत्याही बँकेच्या कार्यक्रमास जाताना सर्वप्रथम मी संबंधित बँकेची कुंडली पाहताे. अर्थात, त्यात ती बँक कशी अाहे, तिचा एनपीए कसा अाहे या दाेन विषयांचा समावेश असताे. उगाच कुणाच्या शिव्या-शाप नकाे म्हणून ही काळजी घेताे. चाेपडा पीपल्स बँकेने महाराष्ट्रात उत्तम काम केले अाहे, असेही पवार म्हणाले.   
 
पुढील स्लाइडवर वाचा, राजकारणात संयम अावश्यक हे गुजराथींकडून शिकलाे : मुख्यमंत्री...
 
बातम्या आणखी आहेत...