आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआरोग्य शिबिराचा दुसरा दिवस; कार्यकर्त्यांनी साथ सोडली; रुग्ण बेहाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अायाेजित केलेल्या अाराेग्य महाशिबिरात दुसऱ्या दिवशी स्वयंसेवक, कार्यकर्त्यांनी साथ साेडल्याने रुग्णांची तारांबळ उडाली. पहिल्या दिवशी तपासणी हाेऊ शकलेले अनेक रुग्ण रविवारी थेट खान्देश सेंट्रल माॅलमध्ये पाेहचले. मात्र, तेथे एकही डाॅक्टर, स्वयंसेवक कार्यकर्ते नसल्याने रुग्णांची पंचाईत झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ताेकडी यंत्रणा, गाेदावरी वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या गर्दीमुळे शिबिराचा दुसरा दिवस गाेंधळाचा ठरला.

चार दिवसीय अाराेग्य शिबिरात प्राथमिक तपासणी केलेल्या रुग्णांसाठी शनिवारचा पहिला दिवस तपासणीचा हाेता. उर्वरित तीन दिवस रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे नियाेजन हाेते. मात्र, प्राथमिक तपासणीचे शिबिर अायाेजित केलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाेस्टर्स, बॅनर्सवर सलग तीन दिवस तपासणी केली जाणार असल्याचे जाहीर केले हाेते. प्रत्यक्षात पहिल्या दिवशी तपासणी करणारे डाॅक्टरच शस्त्रक्रिया करणार असल्याने तपासण्या शक्य नसल्याचे दुसऱ्या दिवशी तपासणीला अालेल्या रुग्णांना सांगण्यात अाले. त्यामुळे अनेक रुग्णांना परत फिरावे लागले. खान्देश सेंट्रलमध्ये असलेले स्वयंसेवक जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्हते. त्यामुळे रुग्णांचा गाेंधळ उडाला. गाेदावरी हाॅस्पिटलमध्ये रुग्णांनी रास्ता राेकाे करण्याचा प्रयत्न केल्याने खुद्द जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना तेथे जावे लागले.
जळगाव महाअाराेग्यशिबिरात रविवारी २२७५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात अाल्या. सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत शस्त्रक्रिया करण्यात अाल्या. नेत्रराेग विभागात रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरू हाेत्या. महाजन यांनी शस्त्रक्रिया सुरू असलेल्या रुग्णालयांमध्ये भेट देऊन रुग्णांची चाैकशी केली.

दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालयात हजार पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी केली. तर २२७५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात अाल्या. त्यात नेत्रराेग ३००, दंतशस्त्रक्रिया २५०, लहान मुलांवरील शस्त्रक्रिया ७०, अँजिअाेग्राफी ४७५, अँजिअाेप्लास्टी ३२, हाडांचे प्रत्याराेपण २, मणका शस्त्रक्रिया ४, हाडांच्या शस्त्रक्रिया २२, बायपास १, कान, नाक, घसा ७२, जनरल सर्जरी ७५०, स्त्रीराेग शस्त्रक्रिया २५०, प्लास्टिक सर्जरी ४७ शस्त्रक्रिया करण्यात अाल्या.

डाॅ.देवपुजारी अाज येणार : मुंबईयेथील न्यूराेसर्जन डाॅ. देवपुजारी हे साेमवारी जळगाव शहरात येणार अाहेत. गाेदावरी हाॅस्पिटल येथे ते मेंदूतील गाठी असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करणार अाहेत.

गोदावरीत क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल
नशिराबाद महाआरोग्यशिबिरातून शस्त्रक्रियेसाठी गोदावरी हाॅस्पिटलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाल्याने रविवारी सकाळी ११ वाजता महामार्गावर वाहतुकीचा खाेळंबा झाला. रुग्णालयातही तपासणीसाठी रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या पथकाने वेळीच धाव घेऊन पुढील अनर्थ टळाला.

महाआरोग्य शिबिरातून तपासणी करून विविध आजारांचे रुग्ण डॉ.उल्हास पाटील यांच्या गोदावरी हाॅस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येत आहेत. मात्र, या रुग्णालयात ७०० रुग्णांवर शस्त्रक्रियेची क्षमता असताना १५०० रुग्ण दाखल करण्यात आले. त्यामुळे गोंधळात भर पडली होती. अखेर गर्दी कमी करण्यासाठी नवीन रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुढील दोन दिवसांची तारीख देण्यात आली. मात्र, आजच आम्हाला दाखल करून घ्या, असा आग्रह रुग्णांसह नातेवाइकांनी धरल्याने गोंधळ वाढला हाेता. शेवटी महिला वसतिगृहात इतर खाेल्यामध्ये रुग्णांची व्यवस्था करण्यात आली.

औषधांचातुडवडा : क्षमतेपेक्षारुग्णांची संख्या वाढूनही आयोजकांकडून पुरेशा औषधांचा पुरवठा झाला नाही. आयोजकांनी ५०० सलाइनच्याच बाटल्या दिल्या आहेत. दोन दिवसांत गोदावरीचे लाख रुपये खर्च झाल्याचे व्यवस्थापक आशिष भिरुड यांनी सांगितले.
२५००रुग्णांची तपासणी : रविवारीरुग्णालयात २५०० रुग्णांची तपासणी केली. तर १५०० रुग्ण दाखल झाले. तसेच ३५ एन्जिओग्राफी, चार बायपास, १६ एन्जिओप्लास्टी, १५० अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग शस्त्रक्रिया झाल्या.

डॉ. लहानेंनी केले ऑपरेशन
पहिल्या दिवशी तपासणी केलेल्या रुग्णांची रविवारी जिल्हा सामान्य रुग्णालय, गाेदावरी, अार्किड अाणि गणपती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात अाली. पुणे, मंुबई अाणि नागपूर येथून अालेल्या डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया केल्या. डाॅ.तात्याराव लहाने यांनी एका दिवसात २०० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्या.

अाणखी शिबिर घेणार
शिबिरात तपासणी हाेऊ शकणाऱ्या रुग्णांसाठी लवकरच अाणखी एक अाराेग्य शिबिर घेणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णांशी बाेलताना सांगितले. दरम्यान, तपासणी झालेल्या परंतु शस्त्रक्रिया हाेऊ शकलेल्या रुग्णांना येत्या मार्च राेजी जामनेर येथे शिबिर हाेणार असल्याचे सांगण्यात अाले.