आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवीन सुलताना यांना जीवन गौरव पुरस्कार, जळगावात 17ला भीमसेन जोशी पुरस्काराचे वितरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना जाहीर झाला असून येत्या १७ मार्च रोजी जळगाव येथे हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार अाहे. लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार सोहळ्यासोबतच पंडित भीमसेन जोशी स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सव १७ ते १९ या कालावधीत शहरात आयोजित केला आहे. 
 
राज्य शासनातर्फे दरवर्षी शास्त्रीय गायन वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार १७ मार्च रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार प्रदान समारंभाला जोडूनच पंडित भीमसेन जोशी स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सव १७ ते १९ या कालावधीत आयोजित केला आहे. १७ मार्च रोजी गायिका प्रीती पंढरपूरकर, गायिका सानिया पाटणकर, सतारवादक समीप कुलकर्णी कला सादर करतील. १८ मार्च रोजी गायक देबबर्ण कर्माकर, गायक धनंजय हेगडे अभिषेक लाहिरी यांचे सरोदवादन होणार आहे. याच दिवशी बेगम परवीन सुलताना सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. १९ मार्च रोजी गायिक उन्मेषा आठवले, गायिका रूचिरा पंडा, बासरीवादक विवेक सोनार आपली कला सादर करतील. या महोत्सवाचे आयोजन वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...