आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Passenger Through Young Boy From Running Train Near Jalgaon

जळगाव : सहप्रवाशांना टॅब न दिल्याने तरुणाला धावत्या रेल्वेतून फेकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सहप्रवाशांना टॅब न दिल्यामुळे त्यांनी एका १९ वर्षीय युवकाला धावत्या रेल्वेगाडीतून फेकून दिले. ही घटना गुरुवारी पाळधीजवळ घडली. या घटनेत युवकाच्या डोक्याला, मानेला गंभीर मार लागला असून, त्याला जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमळनेर येथील भूषण संजय भदाणे हा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दररोज अमळनेरहून जळगावला ये-जा करतो. गुरुवारी दुपारी एक वाजता तो अमळनेरहून गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसमध्ये (१९४५३) चढला. डब्यात जागा नसल्याने तो दाराजवळ टॅब हाताळत खाली बसला. याच डब्यातील दोन तीन परप्रांतीयांनी त्याला टॅब मागितला.
भूषणने नकार देताच त्याच्याकडून टॅब हिसकावून घेत त्या तरुणांनी पाळधीजवळ त्याला खाली फेकून दिले. रेल्वे रुळाजवळील शेतातील शेतकऱ्यांनी त्याला जखमी अवस्थेत महामार्गापर्यंत आणले. तेथून त्याला जळगावला आणून लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तो नाशिक येथील संदीप फाउंडेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.