आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओसांडून वाहतोय बंधारा, पर्यटकांचा ओघ वाढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - अद्भुत निसर्ग सौंदर्य लाभलेल्या पाटणा देवीच्या विकासासाठी कृती आराखडा तयार केला होता. काही कामे पाटणादेवी येथे काही कामे नागदच्यावर औंट्रम घाटात पुरणवाडी क्षेत्रात केले जातील. अर्थ-नियोजन वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे आमदार पाटील यांनी पाठपुरावा केला. ऑगस्ट रोजी याबाबत शासन निर्णय झाला असून एकूण मंजूर महाराष्ट्रातील निधीपैकी सर्वाधिक निधी गौताळा अभयारण्यासाठी मिळाला आहे. आमदार उन्मेष पाटील यांनी गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा वनाधिकारी निसर्गमित्रांना सोबत घेऊन कामांची यादी तयार करून ती शासन दरबारी सादर केली होती. याबाबत ‘दिव्य मराठी’वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे.

१८ किमीचाळीसगाव पासून लांब
छाया : सोजिलाल हाडपे
एप्रिल २०१५ रोजी ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त.
पाटणादेवी अभयारण्यातील डोंगरी नदीवर ओसांडून वाहणारा बंधारा.

पुरणवाडीसाठी १३ लाख ६३ हजार
नागदपासून१५ कि.मी.अंतरावर ट्रम घाटात सिल्लोड-नागद मार्गावर पुरणवाडी येथे निसर्ग पर्यटन क्षेत्र आहे. या ठिकाणी म्युझियम साकारण्यात आले असून म्युझियमसह परिसराच्या विकासासाठी तब्बल १३ लाख ६३ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. म्युझियममध्ये २६ हजार हेक्टरवरील अभयारण्यात नेमकी कोणती प्रेक्षणीय स्थळे आहेत; त्यांचे इतिहासकालीन महत्त्व, प्रेक्षणीय स्थळाचे पेटिंग्ज असेल. गाईडमार्फत ही सर्व माहिती कळू शकेल.

कामांमुळे अभयारण्याचे रूप पालटणार असून पर्यटकांचा ओघही यामुळे वाढणार आहे. म्युझियमच्या (माहिती केंद्र) बांधकामाची पाहणी आमदार उन्मेष पाटील, उपवनसंरक्षक सुनील ओहोळ, सहायक वनसंरक्षक जयकर, सर्पमित्र राजेश ठोंबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पांडे यांनी केली होती. त्यानंतर विविध कामांचा प्रस्ताव तयार करून तो अर्थ-नियोजन वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे सादर करण्यात आला.
ही कामे झाली मंजूर; विकासकामांकडे लक्ष
पुरणवाडीयेथे निसर्ग पर्यटन केंद्रासाठी सोलर- लाख, निसर्ग म्युझियममध्ये फोकस लाइट लावण्यासाठी ८० हजार, याच ठिकाणी बगिचा तयार करण्यासाठी लाख रुपये, पर्यटनासाठी बांधण्यात आलेल्या डाॅरमेंटरी साहित्य फर्निचर खरेदीसाठी लाख, पुरणवाडी येथीलच यू पाॅइंटवर जाण्यासाठी पादचारी पूल बांधण्यासाठी लाख ८३ हजार, हिवरखेडा निसर्ग केंद्रासाठी पर्यटकांना बैठकीसाठी १०० फायबर खुर्च्या साउंड सिस्टिम डायस खरेदीसाठी दीड लाख रुपये आदी.
२६ हजारहे. जंगल
अभयारण्यासाठी ४६.५५ लाख
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सन २०१५-१६च्या योजनेंतर्गत गौताळा अभयारण्यात निसर्ग पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला होता. शासनाने आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यात ४६.५५ लाख रुपये मंजूर केले आहेत. यात विविध प्रकारची १७ कामे होणार असून आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.