आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथरी दारू, जुगार आदी अवैध धंद्यांसाठी एल्गार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : तालुक्यातील पाथरी येथील ग्रामसभा रोजी सकाळी वाजता विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या आवारात होणार आहे. यात गावातीलमहत्त्वपूर्ण चर्चा होईल. पाथरीच नव्हे, तर परिसरच दारूमुक्त करण्याचा सूर ग्रामस्थांनी आवळला आहे. याबाबतचे निवेदन एमआयडीसी पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे. 
 
पाथरी गावात आठ जण हातभट्टी अन्य दारू विक्री करीत आहेत. दारूसह गुटखा विक्रीचे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे व्यसनाधीन तरुणांचे प्रमाण वाढत असून पालक हताश होत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.
 
दारू विकणाऱ्यास हजार रुपये, दारू पिताना आढळल्यास ५०० रुपये आणि गावात दारू पिऊन आल्यास १०० रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव या ग्रामसभेत ठेवण्यात येणार आहे. दारुबंदी विषयी तंटामुक्ती समिती देखरेख ठेवणार आहे. याच प्रकारे वडली, डोमगाव, जवखेडा, सामनेर, लासगाव या गावांनी सुद्धा ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. 
 
नूतन वर्षारंभाप्रसंगी विक्रेत्यांच्या घरांसमोर मूकमोर्चा 
दारूमुळे गावातील होणारे नुकसान लक्षात घेता असंख्य ग्रामस्थ नूतन वर्षानिमित्त सर्व दारू विक्रेत्यांच्या घरी मूकमोर्चाच्या स्वरुपात गेले. गावाचे हित बघून दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. परंतु, एकच दिवस सायंकाळपर्यंत दारू विक्री बंद राहिली.
 
नंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’झाली. आता संपूर्ण दारू बंदी झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय पाटील, प्रदीप पाटील, सुरेश पाटील, कोमल कदम, एकनाथ जाधव, बाळू पाटील आदी ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. 
बातम्या आणखी आहेत...