आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅथॉलॉजी लॅब निवडण्याचा अधिकार रुग्णांना हवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आजाराचे निदान होण्यासाठी डॉक्टर रग्णाला वेगवेगळ्या चाचण्या करण्यास सांगतात. तसेच या चाचण्या करण्यासाठी विशिष्ट पॅथॉलॉजी लॅब वा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला देतात. कारण तेथे आकारण्यात येणाऱ्या तपासणी शुल्कात डाॅक्टरांचे कमिशन असते. मात्र, हे कमिशन रुग्णाकडून वसूल केले जात असल्याने त्यांना अतिरिक्त भुर्दंड बसतो. डाॅक्टरांनी कमिशन नाकारल्यास रुग्णांना तपासणीसाठी येणारा खर्च कमी होऊ शकतो. याशविाय पॅथाॅलाॅजी लॅब नविडण्याचा अधिकार रुग्णांना हवा.

स्पर्धेमुळे काही पॅथाॅलाॅजी लॅबचालक रुग्ण पाठवणाऱ्या डाॅक्टरांना संबंधित तपासणीमागे ठरावीक कमिशन देत असतात. वैद्यकीय क्षेत्रात हा अलिखित नियमच झाला असून, त्यात काहीही गैर नसल्याच्या प्रतिक्रियादेखील येत आहेत. दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रातील उपजीविकेच्या साखळीमध्ये शेवटचा आणि महत्त्वाचा घटक असलेल्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत आहे. अनेक वेळा अनावश्यक चाचण्या डाॅक्टरांच्या सांगण्यावरून तपासणी अहवालमध्ये गोलमाल करण्याचे प्रकार घडत असतात. मूठभर डाॅक्टरांच्या अशा प्रकारांमुळे जळगावच्या वैद्यकीय क्षेत्राबाबत बाहेरच्या शहरांमध्ये फारसे चांगले मत नसल्याचे एका डाॅक्टराने ‘दवि्य मराठी’शी बोलताना सांगितले. वैद्यकीय क्षेत्राची ही बदनामी टाळण्यासाठी डाॅक्टर आणि पॅथाॅलाजी लॅब यांच्यातील व्यवहारांमध्ये रुग्णांसाठी पारदर्शकता येणे आवश्यक आहे. डाॅक्टरांनी कमिशन नाकारल्यास रुग्णांना तपासणी शुल्कात काही प्रमाणात दिलासा मिळणे शक्य असल्याचे एका पॅथाॅलाॅजी चालकाने नाव छापण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

काहींचा कमिशनला नकार
शहरातीलकाही नामांकित डाॅक्टर वैद्यकीय तपासण्यांसाठी विशिष्ट पॅथाॅलाॅजी लॅबचा आग्रह धरत नाहीत. तसेच लॅबचालकांकडून कमिशनदेखील स्वीकारत नाहीत. तथापि, कमिशन नाकारणाऱ्या डाॅक्टरांकडील रुग्णांना शक्य असूनही पॅथाॅलाॅजीचालक पैसे कमी करत नसल्याचीदेखील स्थिती आहे.
डाॅक्टरनिहायफी वेगळी
भास्करमार्केटमधील एका अद्ययावत पॅथाॅलाॅजी लॅबमध्ये एकाच प्रकारच्या रक्ततपासणीसाठी वेगवेगळ्या फी आकारल्या जातात. रुग्णाला कोणत्या डाॅक्टराने पाठवले यावर त्याची फी अवलंबून असते. कमिशन नाकारून रुग्णांना तपासणीमध्ये सूट देण्याची सूचना केलेल्या एका डाॅक्टराच्या रुग्णाकडून ५० रुपये फी कमी आकारली जात आहे. इतर डाॅक्टरांची चिठ्ठी असल्यास मात्र ५० रुपये जास्तीचे आकारले जातात.

योग्य डाॅक्टर नविडा
रुग्णांनीविशिष्ट लॅबचा आग्रह धरणाऱ्या योग्य डाॅक्टरांची नविड केली पाहिजे. पॅथाॅलाॅजी लॅबचा तपासणी अहवाल रुग्णांचा असला तरी, तो डाॅक्टरांसाठीच असतो. अचूक निदानावरच पुढील उपचार अवलंबून असल्याने तपासण्या पूर्ण प्रक्रियेतून झाल्या पाहिजेत. सध्याचे दर त्यासाठी योग्य आहेत. कमिशन देण्यासाठी तपासणीच्या गुणवत्तेमध्ये तडजोड केला जाण्याचा धोका असतो. अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. डाॅ.धनंजय बोरोले, अध्यक्ष, पॅथाॅलाॅजिस्ट डाॅक्टर्स
बातम्या आणखी आहेत...