आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औषधांच्या तुटवड्याने रुग्ण बेहाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नवीन औषधी धोरणानुसार महत्त्वाच्या व जीवरक्षक अशा 348 औषधांच्या किमती कमी झाल्या. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागतही झाले. मात्र 10 दिवस उलटूनही बहुतांश औषधे उपलब्ध नाहीत. जी आहेत, ती जुन्या किमतीने विकता येत नाहीत. याचा परिणाम म्हणजे गेल्या आठ-दहा दिवसांपासून अनेक महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा असून रुग्णांचे मात्र हाल होत आहेत.

नवीन औषधी धोरणानुसार पूर्वीच्या दराने औषधांची विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना 45 दिवसांची मुदत देण्यात आली. ही मुदत 29 जुलैला संपली असली तरी नवीन दरांतील बहुतांश औषधे कंपन्यांकडून उपलब्ध झालेली नाहीत. जास्तीच्या दराची औषधी कमी किमतीने विकणे अशक्य आहे. त्यामुळेच अनेक विक्रेत्यांनी ही औषधे परत कंपन्यांकडे पाठवली आहेत. मोजकी म्हणजे 20 टक्के औषधे सोडली तर नवीन किमतीनुसार लेबलिंग करून औषधे अद्याप तरी बाजारपेठेत दाखल झाली नाहीत. त्यामुळे डॉक्टरांची मोठी पंचाईत झाली आहे. त्याचा फटका थेट रुग्णांना बसतो आहे.

बालक, गर्भवतींचे हाल
बालरोगतज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, बालरुग्णांमध्ये तापासाठी मांडीवर देण्यात येणारे इंजेक्शन ‘पॅरासिटॅमॉल’मिळत नाही. त्याचप्रमाणे स्त्रीरोगतज्ज्ञांना अनेक औषधींसाठी अडचणी येत आहेत. ऑपरेशन किंवा ड्रेसिंगनंतर वापरण्यात येणारे आयोडीनचा साठाही संपत आल्याने डॉक्टर विचारात पडले आहेत. अँट्रॉपीन, अँडरिनलीन ही औषधी अद्याप आलेली नाही. काही कंपन्यांची औषधी असली तरी सर्वच कंपन्यांकडील माल उपलब्ध झालेला नाही.