आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट प्रॅक्टिसचा रुग्णांना बसतोय अार्थिक भुर्दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रुग्णालयालाच जोडलेल्या मेडिकलमधून अाैषधी घेण्याची सक्ती करणे, विशिष्ट पॅथॉलॉजी लॅबकडून तपासण्या करण्यासंदर्भात अाग्रह धरणे, इतर डाॅक्टरांकडे रुग्ण पाठवल्यास कमिशन घेणे आदी प्रकारची कट प्रॅक्टिस जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात वाढलेली अाहे. ही कट प्रॅक्टिस रुग्ण त्यांच्या नातेवाइकांच्या अंगवळणी पडली असून, याविषयी कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ हाेत अाहे. त्यामुळे अनेक रुग्णांना अार्थिक भुर्दंड साेसावा लागत अाहे.

‘पृथ्वीतलावरचा देव’ अशी डाॅक्टरांना उपमा देण्यात येते. मात्र, सद्य:स्थितीत वैद्यकीय क्षेत्रात नफेखाेरीच्या वृत्तीने शिरकाव केल्याने हे क्षेत्र बदनाम झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या विश्वासार्हतेला तडा जात आहे. जळगाव शहरातील बहुतांश रुग्णालयांना मेडिकल दुकान जाेडलेले अाहे. हे मेडिकल प्रामुख्याने डॉक्टरचे स्वत:चे किंवा नातेवाइकांचे असल्याने डाॅक्टर रुग्णांना तेथूनच अाैषधी घेण्याचा सल्ला देतात किंवा तेथे उपलब्ध असलेली अाैषधीच लिहून दिली जाते. तसेच रक्त, लघवी तपासणीदेखील विशिष्ट लॅबमधून करण्यास सांगितले जात अाहे. या प्रकारांमुळे बिचारा रुग्ण मात्र लुटला जात अाहे.

कट प्रॅक्टिससंदर्भात आयएमएची भूमिका कठाेर आहे. कट प्रॅक्टिसबाबत आयएमएने काही रुग्णालयांना नोटिसाही बजावलेल्या आहेत. त्यात डीएमएलटी रेडिअाेलॉजिस्टचा जास्त समावेश आहे. तसेच औषध कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या पॅकेजबाबत इंडियन मेडिकल कौन्सिलने आचारसंहिता तयार केली आहे. त्यामुळे आता पॅकेजचे प्रमाण कमी झाले आहे. - डॉ.अनिल पाटील, सचिव, आयएमए