आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patriotic Greetings To Netaji Subhash Chandra Bose

देशभक्तीपर गीतांतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सुभाष चौक पतसंस्थेतर्फे गुरूवारी सुभाष चौकात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आधारित नाटीका, गीत, नृत्य सादर केले. तसेच अनेक शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्थांतर्फे प्रतिमेचे पूजनासह देशभक्तीपर गीते सादर करून अभिवादन केले.

सुभाष चौकात ध्वजवंदन

सुभाष चौक पतसंस्थेतर्फे नेताजी सुभाष चौकात सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर महापौर राखी सोनवणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी आयुक्त संजय कापडणीस, नगरसेवक सुरेश भोळे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, सामाजिक कार्यकर्ते ललित चौधरी, संस्थेचे अध्यक्ष र्शीकांत खटोड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्वात कमी म्हणजे 26 इंच उंचीच्या आठवर्षीय आर्यन आनंद परदेशी या वरणगावच्या मुलाचा सत्कार करण्यात आला. तसेच शहरातील शाळांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यानंतर मोहन तायडे यांचा ऑर्केस्ट्रा झाला. संजय गांधी यांनी सूत्रसंचालन केले. सी.एम.अग्रवाल, सपन झुनझुनवाला, मनीष अग्रवाल, प्रवीण भाटे, विजय जगताप, भरतकुमार शहा आदींचे सहकार्य लाभले.

भाषणातून जीवनकार्याची ओळख

प्राथमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका गायत्री भंगाळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून लीलाधर नारखेडे व गणेश लोडते उपस्थित होते. या वेळी सागर घाईट, योगेश पाटील व भाग्यर्शी वाघ या विद्यार्थ्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याकार्याविषयी माहिती दिली. सोपान पाटील यांनी सूत्रसंचालन केले. भूषण जोगी यांनी आभार मानले. शिल्पा झोपे, ज्योती महाले, प्रशांत जगताप, प्रमोद चौधरी आदींनी सहकार्य केले.