आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूनप्रकरणी तिसर्‍या आरोपीचा शोध सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पवन एक्स्प्रेसमधील प्रवाशाच्या खून प्रकरणी दोन आरोपींना लोहमार्ग पोलिस एलसीबी विभागाने अटक केली असून तिसर्‍या आरोपीचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे खिसेकापू असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे.

मुंबईकडून येणार्‍या पवन एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून सुनीलकुमार साथी (रा. जगतपूर, बिहार) हा युवक प्रवास करीत होता. किरकोळ कारणांतून तीन युवकांनी चाकूने भोसकून त्याचा खून केल्याची घटना २९ एप्रिल रोजी मनमाड ते नांदगाव स्थानकादरम्यान घडली होती. खुनाची घटना घडल्यानंतर आरोपी नांदगाव रेल्वेगेटजवळ उतरून पसार झाले
होते. जीआरपी एलसीबीचे निरीक्षक वासुदेव देसले, मनमाडचे सहायक पोलिस निरीक्षक एस. जी. सुरसे, रवींद्र खंडारे, दिवाणसिंग राजपूत, धर्मपाल गवई यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. गाडीतील प्रवाशांनी दिलेल्या वर्णनावरून तपासासाठी त्यांनी कंबर कसली होती. जनरल डब्यात मनमाड स्थानकावरून तीन युवक बसल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी त्यानुषंगाने तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर त्यांनी संजय वसंत पवार, (रा. फुले कॉलनी, चाळीसगाव), सचिन पाटील (रा. तांबोळी, ता. चाळीसगाव) या दोघा आरोपींना अटक केली आहे. तिसरा आरोपी हा उस्मानाबादचा असल्याचे सांगण्यात येत असून सोमवारी जीआरपी एलसीबी विभागाचे पथक त्याला ताब्यात घेण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

आरोपी खिसेकापू
पवनएक्स्प्रेसमध्ये खिसा चाचपडणार्‍या तिघा युवकांना सुनीलकुमार साथी याने हटकले होते. शाब्दिक वादातून शिवीगाळही झाली होती. त्यामुळे तिघांनी चाकूने भोसकून साथीचा खून केला. त्यानंतर नांदगाव रेल्वेगेटजवळ गाडी थांबली असता तेथून ते पसार झाले होते, अशी माहिती जीआरपी एलसीबीचे निरीक्षक देसले यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली.