आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्याशी लग्न, तिसऱ्यासोबत पोबारा म्हणून पहिल्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव / यावल - यावलच्या एका तरुणीने एकासोबत प्रेम. दुसऱ्याशी लग्न आणि लग्नानंतर तिसऱ्यासोबत पलायन केले. विवाहानंतर तरुणी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या पतीने आणि नातेवाइकांनी पहिल्या प्रियकरावर पळवून नेल्याचा आळ घेतला. हा आरोप सहन झाल्यामुळे नैराश्य आलेल्या तरुणाने आत्महत्या केली. अखेर बेपत्ता विवाहीत तरुणी गेल्या शनिवारी आपल्या नव्या पतीसह पोलिस ठाण्यात हजर झाली आणि त्यानंतर सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.
एखाद्या सस्पेन्स -थ्रिलर चित्रपटाला शोभेल अशी ही घटना आहे. जळगावातील शिव कॉलनीत गेल्या गुरुवारी २० ऑक्टोबर रोजी मूळचा यावल तालुक्यातील बोरावल खुर्दचा रहिवासी असलेल्या पवन सुभाष पाटील या २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने आई-वडील, आजी, मित्र अाणि इतरांच्या नावे एकूण सात चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. त्याचे आई-वडील शेतमजुरी करतात. बांभोरी येथील चेसिस ब्रेक्स कंपनीत पवन कामाला होता. मुलगी पळवून नेल्याचा आरोप झाल्यामुळे बदनामी झाली, असा उल्लेख होता. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे सुसाइड नोटवरून वाटत होते. त्यामुळे पोलिसांनीही त्या दिशेने तपास सुरू केला होता. सुरुवातीला या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली होती. आत्महत्येचे गूढ मात्र वाढले होते. ती तरुणी कोण हे स्पष्ट होत नव्हते.

फ्लॅशबॅक
बोरावल खुर्द येथील शीतल या तरुणीचा २३ एप्रिल २०१६ रोजी वैभव पाटील या तरुणासोबत विवाह झाला. सहा महिन्यांनंतर १४ ऑक्टोबर २०१६ रोजी शीतलने एका तरुणासोबत घरातून पोबारा केला.
शीतलचा पती इतर नातेवाइकांनी यावल पोलिस ठाण्यात विवाहिता हरवल्याप्रकरणी तक्रार नोंदवली. त्यांनी पवनवर संशय व्यक्त केला. ती नेमकी कुणाबरोबर पळून गेली, याचा सुगावा लागत नसल्याने पोलिसांनी पवन सुभाष पाटील या तरुणाला बोलावले. पवनची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.

तरुणी बेपत्ता होण्यामागे आपला हात असल्याच्या संशयावरून आपली पोलिसांनी चाैकशी केली. त्यामुळे पवनला नैराश्य आहे. त्यामुळे तो प्रचंड तणावात आला होता.
निराश झालेल्या पवनने २० ऑक्टोबर रोजी जळगाव येथील शिव कॉलनीतील गट नं. ६०.प्लॉट नंबर येथील भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आई-वडील, आजी, मित्र इतरांसाठी सात चिठ्ठ्या लिहिल्या. यात त्याने तो कसा निर्दोष आहे, याबाबत बाजू मांडली होती. या चिठ्ठ्यांमुळे पोलिसांना पुढचा धागा मिळाला.

बातम्या आणखी आहेत...