आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनरेगाच्या आठ हजार मजुरांची मजुरी थकली, कष्ट करूनही ऑक्टोबर 2016 पासून पैसे नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - शासनाकडून मनरेगाद्वारे शाश्वत काम मिळाले. मात्र, पोस्ट विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील २७०, तर भुसावळ पोस्ट विभागातील पाच तालुक्यातील हजार मजुरांची ऑक्टोबर २०१६ पासूनची लाखो रुपये मजुरी थकली आहे. मंगळवारी यावलमधील काही महिला मजुरांनी तहसील कार्यालय गाठून कष्टाचे पैसे मिळणार कधी? असा संताप व्यक्त केला. 
 
ग्रामीण भागातील गरजुंना शाश्वत रोजगार मिळावा म्हणून शासनाकडून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना राबवली जाते. यात सहभागी मजुरांना जॉबकार्ड देवून त्यांच्या कामाची नोंद घेतली जाते. त्यांना त्यांच्या बँक खात्याव्दारे मजुरी अदा करण्यात येते. यात यावल तालुक्यातील २७० आणि भुसावळ पोस्ट विभागात येणाऱ्या यावलसह चार तालुक्यांतील सुमारे हजार मजुरांची खाती पोस्टात आहेत. 

मात्र, या सर्व मजुरांना ऑक्टोबर २०१६ पासूनचे रोजगार हमीचे पैसे पोस्ट खात्यात प्राप्त झाले नाहीत. वारंवार पोस्टात चकरा मारून हैराण झालेल्या काही संतप्त महिला मजुरांनी मंगळवारी तहसील कार्यालय गाठले. येथे मनरेगाचे अव्वल कारकून जितेंद्र पंजे आणि सहायक संतोष पाटील यांच्याकडे व्यथा मांडल्या. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील २७० मजुरांचे तब्बल १२ लाख ४४ हजार रूपये मनरेगाच्या खात्यातून थेट पोस्ट विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तरीही कष्टाचे पैसे केवळ पोस्ट खात्याच्या भोंगळ कारभारामुळे अद्यापही मजुरांना मिळत नसल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत. 
 
राष्ट्रीयकृत बँकेत खाते 
पोस्टाच्याया भोंगळ कारभारामुळे मनेरगाच्या मजुरांनी आपले खाती राष्ट्रीयकृत बँकेत उघडावी. त्यांची माहिती जाॅबकार्ड सोबत द्यावी, असे आवाहन मनरेगाचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिल्याचे जितेंद्र पंजे यांनी सांगितले. यामुळे अडचणी सुटण्यास मदत होईल. 
 
यादी प्राप्त नाही 
मजुरांचेपैसे मनरेगाकडून पोस्ट खात्याकडे वर्ग झाल्याचे निदर्शनास आल्यावर जितेंद्र पंजे यांनी भुसावळ पोस्ट कार्यालयात मिलिंद बऱ्हाटे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पैसे प्राप्त झाले आहेत, मात्र मजुरांची यादी औरंगाबाद येथून प्राप्त झालेली नाही, असे सांगण्यात आले. 
 
बातम्या आणखी आहेत...