आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शांतता समितीच्या बैठकीत गाजला रस्ता दुरुस्तीचा मुद्दा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विसर्जनमिरवणुकीच्या मार्गांवरील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी वर्षभरापूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. हाच मुद्दा शुक्रवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीतील चर्चा अन् उद्रेकाचा ठरला. तांत्रिक अडचणींमुळे कामे करता येत नाही आणि लोकप्रतिनिधींवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात. तसेच कारागृहात जावे लागल्यानंतर कुणी सोबत येत नाही, असे उत्तर सावकारे यांनी दिल्यानंतर बैठक चांगलीच तापली होती.
गणेश विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी शुक्रवारी दुपारी १२ वाजता अल्पबचत भवनात शांतता समितीची बैठक झाली. या वेळी पालकमंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, पोलिस अधीक्षक डॉ.जे.डी.सुपेकर, महापालिका आयुक्त संजय कापडणीस, अप्पर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, आमदार गुरुमुख जगवाणी, क्रॉम्प्टनचे युनिट हेड भवानीप्रसाद राव, सचिन नारळे, पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव आदी उपस्थित होते.
विसर्जनाच्या दिवशी विजेची अडचण येऊ नये म्हणून क्राम्प्टनचे २५ इंजिनिअर मिरवणूक मार्गांवर पॅट्रोलिंग करणार आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित होणार नाही याचीही दक्षता घेण्यात येणार आहे. भवानीप्रसादराव, युनिटहेड, क्रॉम्प्टन कोणत्याही उत्सवात अप्रिय घटना घडल्यानंतर त्या भागाला वर्षानुवर्षे वाईट परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे एका दिवसासाठी एकमेकांचे शत्रू बनून कोणतीही अप्रिय घटना घडू देऊ नका. तसेच सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवून भावना भडकू देऊ नका.