आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारावेर - शहरात शुक्रवारी बंद असल्याच्या अफवा सर्वत्र पसरवण्यात आल्या. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व्यापारी-विक्रेते, दुकानदारांनी व्यवहार पूर्ववत ठेवावे. अपप्रवृत्तींवर कारवाई करण्यासाठी सक्षम असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले. गुरुवारी शांतता समितीच्या सदस्यांना सोबत घेवून पोलिसांनी शहरातून रॅली काढताना हे आवाहन केले.
शहरात गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीमुळे अजूनही भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचा पुढाकार, सर्वसामान्यांनी घेतलेल्या शांततेच्या धोरणामुळे शहर आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, अधून-मधून शहर बंदच्या अफवा पसरत असल्याने दैनंदिन व्यवहारांसह शहराची शांतता गढूळ होत आहे. शुक्रवारी (दि.25) बंद असल्याची अफवा गुरुवारी आणि त्यापूर्वी शहरात पसरली होती. याबाबत कुणकुण लागताच पोलिसांनी शांतता समिती सदस्यांसोबत संवाद साधला. काही दिवसांपूर्वी विनाकारण शहर बंद झाल्याने त्याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून सदस्यांसोबत संवाद साधण्यात आला. डीवायएसपी देवेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला नगराध्यक्ष दारा मोहंमद, पोलिस निरीक्षक अनिल आकडे, नायब तहसीलदार सी.एम.वाघ उपस्थित होते. अँड.एम.ए.खान, प्रकाश मुजुमदार, उपनगराध्यक्ष प्रल्हाद महाजन, नगरसेवक पद्माकर महाजन, अशोक शिंदे, कांता बोरा यांनी मनोगत व्यक्त केले. शहरातील सामाजिक सलोखा कायम राहील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचा शब्द दिला.
माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, नगरसेवक अनिल अग्रवाल, प्रेमचंद गांधी, वीज वितरण कंपनीचे अभियंता पराग चौधरी, पीपल्स बँकेचे उपाध्यक्ष अरुण महाजन, गयास शेख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, आसीफ मोहंमद, अँड.प्रीती लोहार, अँड.सूरज चौधरी, शैलेंद्र अग्रवाल, विजय गोटीवाले, सुधा नाईक, नितीन पाटील, शीतल जोशी, पंकज वाघ, लक्ष्मीकांत लोहार, सीमा भालेराव यांनी बैठकीत सहभाग घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.