आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेवीदार देणार मंत्रालयावर धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ठेवीदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ठेवीदार हितसंवर्धन तथा बचाव समितीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास सोमवारी 16 जून रोजी संघटनेतर्फे मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
राज्य शासनाने ठेवीदारांसाठी अर्थसहाय्याच्या तीन योजना जाहीर केल्या आहेत. मात्र, जिल्हा प्रशासन आणि सहकार विभागाने ठेवीदारांचे प्रस्तावच शासनाकडे पाठवले नाहीत. अशा वंचित ठेवीदारांना मदतीचा लाभ मिळवून देण्याची मागणी मंगळवारच्या मोर्चात करण्यात आली. अडचणीतील पतसंस्थांना 200 कोटी रुपयांचे कर्जस्वरूप अर्थसहाय्य देऊन विधवा, परितक्ता, दारिद्ररेषेखालील व्यक्ती, सेवानिवृत्तांना 10 हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते.
उपवर मुलींना एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते. यातील बरेचसे प्रस्ताव तालुका सहनिबंधक कार्यालयाकडे पडून आहेत. हे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवावेत. तालुका आणि जिल्हास्तरीय समितीने हे प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठवावे, अशी मागणी करण्यात आली.