आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकीमुळे पालिकेच्या विजेला क्रॉम्प्टनची कात्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वीजबिलाची थकबाकी 7 कोटींपर्यंत गेल्याने क्रॉम्प्टन ग्रीव्हजने सोमवारी दुपारी 4 वाजता पालिकेच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन कापले होते. थकलेली रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर कापलेले कनेक्शन सायंकाळी पुन्हा जोडण्यात आले.
क्रॉम्प्टन ग्रीव्हजने सोमवारी पालिकेच्या पंपिंग स्टेशनची वीज कापली होती. पालिकेने वीजबिलापोटी 33 लाखांचा धनादेश संबंधितांना देण्याचा प्रय} केला; मात्र एवढी कमी रक्कम घेण्यास क्रॉम्प्टनने सुरुवातीला नकार दिला. नंतर आयुक्तांनी चर्चा केल्यानंतर धनादेश घेतल्यानंतर व काही अटीशर्तींच्या अधीन राहून 5.40 वाजता पुन्हा कनेक्शन जोडण्यात आले. पालिकेने नियमित बिलासह किमान 10 लाखांचे नियमित हप्ते देण्याची मागणी क्रॉम्प्टनने केली आहे.