आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pension Distribution, Latest News In Divya Marathi

पेन्शन अन् भविष्यनिर्वाह निधीसाठी ज्येष्ठांची फरपट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पेन्शन वितरणात होणारी दिरंगाई, भविष्यनिर्वाह निधी मिळवण्यासाठी होणारी भटकंती व कोषागार कार्यालयाकडून ज्येष्ठांची होणारी हेटाळणी या विषयीचा पाढाच सेवानिवृत्तांनी शुक्रवारी उपमहालेखापांलापुढे मांडला. निमित्त होते, जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात झालेल्या निवृत्ती वेतनधारकांच्या कार्यशाळेचे. निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतन व भविष्यनिर्वाह निधीबाबत समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
उपलेखापालांचा काढता पाय

प्रथम सत्रात उपलेखापाल नीलेश पाटील यांनी सेवानिवृत्तांना थोडावेळ मार्गदर्शन केले, सेवानिवृत्तांच्या वाढत्या तक्रारींनंतर उपलेखापालांनीही अल्पबचत भवनातून काढता पाय घेतला. त्यानंतर थेट दुसर्‍या सत्रातच त्यांनी हजेरी लावली. जिल्हा परिषदेचे लेखापाल राजेंद्र साळुंखे यांनीही ज्येष्ठांच्या समस्या जाणून न घेता बाहेर जाणेच पसंत केले. त्यामुळे नेहमीप्रमाणेच कोषागार अधिकारी कार्यालयातीलच कर्मचार्‍यांपुढे सेवानिवृत्तांनी न्याय मिळण्याच्या भावनेतून तक्रारी मांडल्या. जिल्हा कोषागार अधिकारी एस.बी. नाईकवाडे, सहायक लेखा अधिकारी जगदीश लुपाटकी, वरिष्ठ लेखाकार अविनाश वीरकर, अपर कोषागार अधिकारी आर.आर. सपकाळे, अपर कोषागार अधिकारी ए.सी.पाटील यांच्यापुढे सेवानिवृत्तांनी व्यथा मांडल्या.
दोन सत्रात झाली कार्यशाळा
उपमहालेखापाल नीलेश चौधरी (मुंबई) यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा झाली. या वेळी राज्यशासनाच्या विविध विभागांतील सेवानिवृत्तांनी वेळेत मंजूर होत नसलेली देयके, शासन रक्कम, थकित कौटुंबिक पेन्शन या विषयावर दोन सत्रात ही कार्यशाळा झाली. उद्घाटनानंतर महालेखापाल नीलेश पाटील यांनी शासनाच्या सेवानिवृत्तांसाठी असलेल्या विविध योजना व लाभ या विषयीची माहिती दिली.