आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाकडे जनतेचा वाढताेय ओढा, अ.भा.प्रचारप्रमुख मनमाेहन वैद्य यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मारुंजी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिवशक्ती संगम मेळाव्याला समाजातून माेठ्याप्रमाणात समर्थन मिळाले. जनमानसातून मिळणारा व्यापक प्रतिसाद ही संघासाठी माेठी उपलब्धी असल्याचा दावा अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमाेहन वैद्य यांनी पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय चिंतन बैठक कुसुंबा येथील गाेसेवा अनुसंधान केंद्रात जानेवारीपासून सुरू झाली. जानेवारीपर्यंत ही बैठक हाेणार अाहे. यानिमित्ताने सरसंघचालक माेहन भागवत यांच्यासह अखिल भारतीय पातळीवरील सुमारे २५ ते ३० पदाधिकारी उपस्थित राहणार अाहेत.

शिवाजी महाराज खूप माेठे व्यक्तिमत्त्व
शिवशक्तीसंगमाच्या व्यासपीठावरील शिवाजी महाराजांच्या छायाचित्रावरून अाक्षेप घेतला जात असल्याचे विचारले असता मनमाेहन वैद्य यांनी अशा प्रकारचे अाराेप हाेत राहतात. संघाचे काम सुरूच राहणार अाहे. छत्रपती शिवाजी महाराज खूप माेठे व्यक्तिमत्त्व अाहे. लहान मुद्द्यांवरून वाद घालणे याेग्य नसल्याचेही ते म्हणाले.