आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणराया जळगावकरांना यंदा तरी कर्जमुक्त करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कर्जाच्याडाेंगराखाली दाबल्या गेलेल्या जळगाव महापािलकेवरील देणी अाता नाके नऊ अाली अाहे. गेल्या काही वर्षांतील परिस्थिती तसुभरही बदललेली नसून जळगावात बाळ जन्मत:च त्याच्या डाेक्यावर तब्बल १२ हजारांचे कर्ज लादले जात अाहे. हेच कर्ज पाच वर्षांपूर्वी १७ हजारांच्या अासपास हाेते. परंतु शहराची लाेकसंख्या वाढत असल्याने डाेक्यावरील बाेजाही इतरांच्या डाेक्यावर लादला जाऊ लागला अाहे. गणरायाचे अागमन झाले असून या विघ्‍न घ्नहर्त्याने पािलका प्रशासन सत्ताधाऱ्यांना सुबुद्धी द्यावी, आणि यंदा तरी जळगावरांना कर्जमुक्त करावे, अशी प्रार्थना भाविक करीत आहेत.
राज्यात एकेकाळी अभिमान बाळगावा, अशी जळगावच्या महापािलकेची स्थिती हाेती. पण अाता कर्जामुळे मनपाला शरमेने मान खाली घालावी लागेल, अशी स्थिती झाली अाहे. घरकुल, वाघूर धरण, विमानतळ, रस्ते, मार्केट यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे घेतलेल्या कर्जावरील व्याज मुद्दलापेक्षा जास्त झाले अाहे. सध्या हुडकाेचे ४९५ काेटी रुपये देणे बाकी अाहे. तसेच जिल्हा सहकारी बँकेचे सुमारे ५९ काेटी तर ठेकेदारांसह अन्य देणी ५० काेटींच्या अासपास अाहे. कर्जाचा हा अाकडा अाता ६११ काेटींपर्यंत पाेहोचला अाहे. त्याचा परिणाम संपूर्ण शहराच्या विकासावर झाला असून गेल्या पाच वर्षांत अापण सांगू शकणार, असे एकही विकासात्मक कार्य डाेळ्याला पाहायला मिळालेले नाही. उलट १२०० रुपयांवर असलेली पाणीपट्टी २००० रुपये झाली अाहे. रस्त्यांची डागडुजी हाेते अन् एकच पाऊस पडला की जैसे थे अशी अवस्था अाहे. करदात्यांचा पैसा पाण्यातच वाहून जाताेय.
लाेकसंख्यावाढल्याने घटला बाेजा
२००१च्या जनगणनेनुसार जळगाव शहराची लाेकसंख्या सुमारे साडे तीन लाखांच्या जवळपास हाेती. तर २०११ च्या जनगणनेनुसार ही संख्या अाता लाख ६० हजार ४६८ झाली अाहे. शहराचा विस्तार झपाट्याने हाेत असून िगरणा नदी, कुसुंबा नशिराबादपर्यंत शहर पाेहोचले अाहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत शहराची लाेकसंख्या पाच लाखांपेक्षा जास्त झाली अाहे. पाच वर्षांपूर्वी प्रत्येक जळगावकरांच्या डाेक्यावर सुमारे १७ हजारांचे कर्ज हाेते. अाता वाढलेली लाेकसंख्या लक्षात घेता हा अाकडा १२,२२० रुपयांवर अाला अाहे. यावरून केवळ लाेकसंख्या वाढली म्हणून कर्जाचा बाेजा कमी झालेला दिसताे. परंतु मनपावरील कर्ज त्यावरील व्याजाचा अाकडा १०० काेटींनी वाढल्याचे चित्र अाहे. त्यामुळे जळगावात अाजही बाळ जन्माला येताच त्याच्या डाेक्यावर कर्जाचा भार असताेच.