आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Provide Cycle To Handicap People] At Jalgaon

अपंग बांधवांना मिळाल्या व्हील चेअर अन् कुबड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळातर्फे शनिवारी 275 अपंग भगिनी व बांधवांना तीन चाकी सायकल, व्हील चेअर, कुबड्या, वॉकर्स, पांढरी काठी, कर्णयंत्रे आदींचे वाटप करण्यात आले. काव्यरत्नावली चौकातील ओंकार रिसॉर्टमध्ये हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजय शेळके, गृह विभागाचे उपविभागीय अधिकारी किशोर पाडवी, नगरसेविका सविता शिरसाळ, शिंपी समाजाचे अध्यक्ष विजय बिरारी , समाजकल्याण विभागाचे निरीक्षक एस.जी. गुजराथी, मुकुंद गोसावी, दिनेश देशमुख, संस्थेच्या अध्यक्षा अंजली बाविस्कर, सीमा साळवे आदी उपस्थित होते.

गृहविभागाचे पोलिस अधीक्षक किशोर पाडवी यांनी अपंगांचे दु:ख हे न समजणारे आहे. जिल्ह्यात त्यांच्यासाठी कार्य करणार्‍या काही संघटना आहेत, त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. विविध समस्यांमध्ये अपंगांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही ते म्हणाले.
माजी नगरसेवक मुकुंद मेटकर, शिवाजी शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या अध्यक्षा अंजली बाविस्कर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले. अंजली बाविस्कर यांनी आभार मानले. संगीता दळवी, नम्रता कुलकर्णी, पुष्पा महाजन, सीमा ठाकूर, रत्नाकर बाविस्कर यांनी नियोजन केले. या वेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अपंगांना वेळेत मिळणार प्रमाणपत्र
डॉ. आर.के. शेळके म्हणाले की, जिल्हा रुग्णालयामार्फत अपंगांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्र वाटपात शिस्तता आणली आहे. योग्य लाभार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र दिली जातील. यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णयही घेतले आहेत. अपंगांनी मध्यस्थाला न घेता, आपण आपले प्रमाणपत्र घ्यावे. अपंग बांधवांनी मनात न्यूनगंड न बाळगता आपल्या हिमतीवर कलाकौशल्यावर यश मिळवावे. शासकीय कामात येणारे अडसर दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.