आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Representative Involved In Cleaning Campaign

स्वच्छ भारत मोहिमेत उतरले लोकप्रतिनिधींसह अधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-शहरातीलशासकीय कार्यालये तसेच शाळांमध्येही स्वच्छता केली जात आहे. तहसील कार्यालयात आमदार सुरेश भाेळे यांच्यासह तहसीलदार गोविंद िशंदे यांनी स्वच्छता केली. यासह विक्रीकर भवन, विविध शाळांमध्येही स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. सागर पार्क येथे सुरू असलेल्या भागवत कथेच्यानिमित्ताने रविवारी अभियान राबवले जाणार आहे.

स्वच्छता अभियानात आपलाही खारीचा वाटा असावा असे प्रत्येकाला वाटते.परंतु नेमके सुरुवात कशी आणि कुठून करायची असा प्रश्न पडतो.चांगल्या कामाची सुुरुवात आपल्या घरापासून करावी अशी म्हण आहे.त्याच धर्तीवर स्वच्छता अभियानाची सुरुवात आपण आपल्या परिसरापासून करू या. तुम्ही एवढेच करा आपल्या परिसरात,गल्लीत,काॅलनीत कचरा असल्यास त्याचा फोटो आमच्याकडे पाठवा.आम्ही तो फोटो आपल्या भागातील लोकप्रतिनिधीकडे पाठवू.त्यांनी परिसर स्वच्छ केल्यास त्याला प्रसिद्धी देऊ. किंवा आपण पुढाकार घेऊन आपल्या भागात स्वच्छता अभियान राबवल्यास आम्ही त्यालाही ठळक प्रसिद्धी देऊ.स्व्वच्छतेचे फोटो dmjalswachha@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा ५८८८१३०८२आणि७८७५७१७८८१यामोबाइल क्रमांकावर व्हाॅट‌्सअॅपने पाठवू शकता. फोटोखाली आपला परिसर आणि नगरसेवकाचे नाव, मंडळ, सोसायटी, आस्थापना, ग्रुपचे नाव नमूद करावे. टीप - मोबाइलने काढलेले फोटो शक्यतो पाठवू नयेत. कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंना प्राधान्य देण्यात येईल.

तहसील कार्यालयात आयोजित स्वच्छता मोहिमेत सहयोग जनप्रबोधन आणि लोककल्याण संस्थेने योगदान िदले. यात संस्थेचे अध्यक्ष मुकेश कुरील, उपाध्यक्ष सतीश दीक्षित, सचिव राहुल भारुडे, महेश मराठे, विनय निंबाळकर, संतोष भापकर, नीलेश बोरा यांनी सहकार्य केले.

विक्रीकर कार्यालय
विक्रीकरकार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विक्रीकर उपायुक्त एस. डी. पागे, एन. ए. तडवी, टी. एन. पठाण, एस. जे. निकाळे यांच्यासह कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. कार्यालय परिसरातील साठलेला कचरा, झाडांच्या वाढलेल्या फांद्या तसेच गवत काढण्यात येऊन परिसर स्वच्छ केला.
सत्संग समितीतर्फे मोहीम
राधाराणी गो-सेवा सत्संग समितीतर्फे रविवारी स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात सागर पार्क येथून दुपारी १२ वाजता होणार आहे.