आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीत मुलींचीच बाजी, टक्केवारीत पाच टक्क्यांनी वाढ; 13 कॉलेजेसचा निकाल 90च्या पुढे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर मोबाइलवर पाहताना विद्यार्थिनी. - Divya Marathi
बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर मोबाइलवर पाहताना विद्यार्थिनी.
जळगाव- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. शहरातील २५ महाविद्यालयांतून हजार १८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात हजार १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ८४.९२ एवढा लागला आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त असून ते टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच गतवर्षाच्या तुलनेत यंदा शहरातील महाविद्यालयांच्या निकालात टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात १३ महाविद्यालयांचा निकाल हा ९० टक्क्यांपेक्षा जास्त असून जी.एच.रायसोनी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. 

दोन दिवसांपूर्वी सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. यात शहरातील २५ कनिष्ठ महाविद्यालयांमधून हजार ४८३ मुले तर हजार ८४९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी मुले पालकांनी सायबर कॅफेंवर गर्दी केली होती. मात्र,अनेकांनी घरबसल्या मोबाइलच्या माध्यमातूनच निकाल पाहिला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना निकालाची प्रत दोन-तीन दिवसांनंतर मिळणार आहे. काही महाविद्यालयांमध्ये निकाल पाहण्याची व्यवस्था केली होती. आपल्या महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय कोण आले? याची माहिती घेण्यासाठी मुले महाविद्यालयात गेली होती. 

जळगाव जिल्ह्याचा निकाल असा 
जळगावशहर ८४.९२ टक्के, ग्रामीण ८४.४१, अमळनेर ९१.८८, भुसावळ ८८.०९, बोदवड ९०.०९, भडगाव ९३.२६, चाळीसगाव ८३.८१, चोपडा ८७.२४, धरणगाव ८६.९२, एरंडोल ८९.९५, जामनेर ९०.७९, मुक्ताईनगर ८४.१४, पारोळा ८८.५१, पाचोरा ८७.१७, रावेर ८८.३७, यावल ८६.५१. 

विज्ञानाचा टक्का वाढला 
जळगावजिल्ह्यात विज्ञान शाखेतून परीक्षा दिलेल्या १८ हजार ७८७ विद्यार्थ्यांपैकी १८ हजार १६४ मुले पास झाली. विज्ञान शाखेतून पास होण्याचे प्रमाण ९६.६८ एवढे आहे. तर नाशिक जिल्ह्याचे ९६.०६, धुळे ९८.०४ आणि नंदुरबारचे ९७.२५ टक्के आहे. 

निकालातील आघाडी 
नाशिक विभागात यंदा नाशिकसह जळगाव, धुळे शहराला मागे टाकत नंदुरबार जिल्हा आघाडीवर पोहोचला आहे. नंदुरबार जिल्ह्याचा निकाल ९१.०५ टक्के असून त्या खालोखाल धुळे ९०.८९, जळगाव ८७.६२ तर नाशिक जिल्हा ८७.०९ टक्के आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीतही नंदुरबार जिल्हा अव्वल ठरला असून ९३.२६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर धुळे ९३.०३, नाशिक ९२.४१ तर जळगाव ९१.७२ टक्के इतके आहे. 

यंदा मुलींसाठी रौप्यमहोत्सवी वर्ष 
राज्यात मुलींनी बाजी मारण्याचे हे सलग २५ वे म्हणजेच रौप्यमहोत्सवी वर्ष ठरले आहे. १९९२ मध्ये पहिल्यांदाच कला, विज्ञान वाणिज्य या तिन्ही शाखांमध्ये राज्यात मुली प्रथम आल्या होत्या. त्यानंतर २०१७ पर्यंत म्हणजेच गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने मुलींचा टक्का वाढत आहे. या वर्षी बारावीच्या स्टेट बोर्ड, सीबीएसई आयसीएसई या तिन्ही प्रकारच्या अभ्यासक्रमात सावित्रीच्या लेकीच अव्वल ठरल्या आहेत. 
 
परीक्षेत नापास झालेल्या मुलांसाठी जुलै महिन्यात फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून निकालानंतर लागलीच महिनाभरात फेर परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतला आहे. त्यानुसार आता बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या मुलांना जूनपर्यंत पुनर्परीक्षेसाठी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर लागलीच जुलै महिन्यात परीक्षा होणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. 

‘गार्डियन्स’चे दोन विद्यार्थी चमकले 
आर्थिकपरिस्थिती खराब असलेल्या एकल पालकांच्या मुलांना मदतीचा हात देऊन त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘गार्डियन्स फाउंडेशन’ या संस्थेच्या सहकार्याने बारावीची परीक्षा दिलेल्या दोघांनी चांगले यश मिळवले आहे. मू.जे. महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत असलेल्या भाग्यश्री प्रमोद महाजन हिने ९२.३० टक्के गुण मिळवत महाविद्यालयातून चवथा क्रमांक पटकावला आहे. तर याच महाविद्यालयातील शुभम दायमा याने देखील ८१ टक्के गुण मिळवले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...