आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Person Has Died In Dhule He Is Belongs To Aurangabad

धुळ्यात मृत्यू झालेला व्यक्तीची ओळख पटली, मयत व्‍यक्‍ती औरंगाबादचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - धुळ्यातील कुसुंबा शिवारात पुलाखाली अत्यवस्थ अवस्थेत आढळलेल्या तरुणाचा जिल्‍हा रुग्णालयात गुरुवारी मृत्यू झाला. त्याच्या खिशात मिळालेल्या एका माहिती पत्रकावरून मृत तरुणाचे नाव राकेश बाविस्कर (३९) असून तो औरंगाबादचा असल्याचे स्पष्ट झाले.
कुसुंबाच्या पुलाखाली गुरुवारी अत्यवस्थ अवस्थेत आढळलेल्या राकेशला जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील समाजसेवक गोकुळ राजपूत, पोलिस श्याम निकम, अनिल जाधव यांनी ओळख पटवण्यासाठी पुढाकार घेऊन ५० जणांना दूरध्वनी केले. तरुणाच्या खिशात औरंगाबाद येथील एका खासगी प्रशिक्षण संस्थेचे पत्रक आढळले. या पत्रकाच्या मागील बाजूस असलेल्या मोबाइल क्रमांकावर गोकुळ राजपूत यांनी संपर्क साधल्यावर तो कुलकर्णी नामक व्यक्तीला लागला. अनेकांना ही पत्रके वाटपासाठी दिली असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. यानंतर कुलकर्णी यांनी या तरुणाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले. ते औरंगाबादच्या हडकोमध्ये राहणारे राकेश पंडित बाविस्कर असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यानच्या काळात रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.