आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उमविची ‘पेट’ परीक्षा जानेवारीत होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत गेल्या दोन वर्षांपासून झालेली पीएच.डी.साठीची ‘पेट’ परीक्षा जानेवारी २०१७मध्ये होण्याचे संकेत मिळाले आहेत. गेल्या आठवड्यात पीएच.डी. परीक्षा समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली आहे.
कोणत्याही विषयात पीएच.डी. करण्यासाठी आवश्यक असलेली ‘पेट’ परीक्षा उमवित दोन वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे पीएच.डी. करण्यासाठी नवीन नोंदणी होऊ शकली नव्हती. याचा परिणाम संशोधन क्षेत्रावर होत होता. मात्र, कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर या विषयावर उपाययोजना केली. ‘पेट’साठी येणाऱ्या अडचणी, यूजीसीचे नवीन नियम या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला ‘पेट’ परीक्षा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मार्च २०१६मध्ये यूजीसीने पीएच.डी.साठी नवीन नोटिफिकेशन जारी केले आहे.

या नोटिफिकेशननुसार सर्व विद्यापीठांना नियमावली तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन नियम तयार होताच ‘पेट’साठी अर्ज मागवण्यात येतील. त्यानंतर वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेता येणार आहे.

लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न
^समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. यूजीसीच्या नवीन नियमांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात दिल्याप्रमाणे निकष नियम लावून परीक्षा घेण्यात येईल. दोन महिन्यांत परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. डॉ.एस.टी.इंगळे,अध्यक्ष, पीएच.डी. परीक्षा समिती, उमवि

इतर विद्यापीठे निघाली पुढे
नियमाप्रमाणे इतर विद्यापीठांमध्ये वर्षातून दोन वेळा ‘पेट’ परीक्षा घेतली जाते आहे. उमवित दोन वर्षांपासून ही परीक्षा झाली नाही. या दोन वर्षांत राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये चार वेळा ही परीक्षा झाली आहे. त्यामुळे उमवि पीएच.डी.च्या बाबतीत मागे पडले होते. आता जानेवारीत पुन्हा परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नव्याने एकदा संधी मिळणार आहे. ‘पेट’ परीक्षा बंद झाल्यामुळे अनेक संशोधकांचा हिरमोड झाला होता. आता त्यांच्या संशोधनाला गती मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...