आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिस्तूलच्या धाकाने भुसावळ-मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गावर दरोडा; अडीच लाखांची लूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरोड्याच्या घटनेत जखमी झालेले व्यवस्थापक. - Divya Marathi
दरोड्याच्या घटनेत जखमी झालेले व्यवस्थापक.

वरणगाव (जि. जळगाव)- राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी बुद्रुक येथील नागराणी पेट्रोल पंपावर शुक्रवारी पहाटे पाच वाजता सशस्त्र दरोडा पडला. पिस्तुलाच्या धाकावर मॅनेजरला ओलीस ठेवत तीन दरोडेखोरांनी अवघ्या २० मिनिटांत २ लाख ४५ हजारांची रोकड लांबवली. मॅनेजरने प्रतिकाराचा प्रयत्न करताच त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून जखमी केले. दरम्यान, पोलिस तपासात पुरावा मागे राहू नये म्हणून दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर घेऊन पोबारा केला.   


वरणगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग सहावर बोहर्डी गाव आहे. बोहर्डीजवळ अमित नागराणी यांचा भारत पेट्रोलियम कंपनीचा पंप आहे. या पंपावर शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास एकाच दुचाकीवर बसून तिघे पेट्रोल भरण्यासाठी आले. गाडीत ५० रुपयांचे पेट्रोल भरल्यानंतर आजूबाजूला न्याहाळून तिघांपैकी एकाने पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक प्रभाकर खंडारे (वय ४५, रा.हद्दीवाल चाळ, भुसावळ) यांच्या कानाजवळ पिस्तूल लावून पैशांची मागणी केली.कपाटात पैसे असल्याचे कळताच त्यांनी खंडारे यांच्याकडे चाव्यांची मागणी केली. खंडारेंनी चाव्या देण्यास नकार देत प्रतिकाराचा प्रयत्न केला. यामुळे दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केला. यानंतर तिघांपैकी एकाने खंडारेंजवळील कपाटाच्या चाव्या हिसकावल्या, तर दुसऱ्याने पंपावर हजर असलेला अन्य एक कर्मचारी सुरेश आनंदा पाटील  यास चाकूचा धाक दाखवून गप्प बसवले.  यानंतर एका दरोडेखोराने कपाटात ठेवलेले २ लाख ४५ हजार रुपये बाहेर काढले.  नंतर दरोड्याचा सुगावा लागू नये म्हणून १० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर मशीन ताब्यात घेतले. तसेच मॅनेजर खडारेंचा मोबाइल घेऊन ५.२० वाजेच्या सुमारास पूर्वेला मुक्ताईनगरच्या बाजूने पोबारा केला. 

 

श्वानपथकालाही लागला नाही अाराेपींचा शाेध 
दरोडेखोरांनी पलायन करताच पंपावरील कर्मचाऱ्यांनी मालक नागराणी यांच्यासह वरणगाव पोलिसांत माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जळगाव येथून श्वानपथक बोलावण्यात आले. मात्र, ठोस माहिती हाती लागली नाही. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती


 

बातम्या आणखी आहेत...