आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदची भीती; एका दिवसात पेट्रोल-डिझेलची दुप्पट विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाराष्ट्रपेट्रोल डीलर्स संघटनेने कर कमी करण्यासाठी मंगळवारी बेमुदत बंदचा इशारा दिला होता. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच दररोज होणाऱ्या विक्रीपेक्षा पेट्रोल आणि डिझेलची दुपटीपेक्षा जास्त विक्री झाल्याची मािहती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश चाैबे यांनी 'दिव्य मराठी’ला दिली.
बंदमुळे ज्यांना पेट्रोल डिझेलची गरज नव्हती त्यांनीही वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेतल्या. काही जण तर साठा करून ठेवण्यासाठी बॅरलमध्येही डिझेल पेट्रोल घेऊन जाताना दिसत होते. अनेक पेट्रोल पंपावर साठा संपल्याने वाहनधारकांचे हाल झाले.
पेट्रोल पंपचालकांनी बंद मागे घेतल्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
संप मागे घेतल्याने मिळाला दिलासा

बंदमुळे पंपांवर ग्राहकांची गर्दी
राज्यशासनाने मागण्या पूर्ण केल्याने मंगळवारपासून अाम्ही राज्यव्यापी बंद पुकारणार होताे. त्यामुळे ग्राहकांनी सोमवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. दररोजच्या विक्रीपेक्षा सोमवारी जास्त प्रमाणात विक्री झाली. प्रकाशचाैबे, जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स संघटना
गणेश कॉलनीतील पंपावर सोमवारी संध्याकाळी पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची अशी झुंबड उडाली होती.
५५ हजार लिटर दररोज होणारी पेट्रोलविक्री
३० हजार लिटर दररोज होणारी डिझेलविक्री
लाख 2५ हजार लिटर सोमवारी झालेली पेट्रोलविक्री
८० हजार लिटर सोमवारी झालेली डिझेलविक्री