आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंप लूटप्रकरणी तिघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवाजीनगर भागातील भाग्यश्री पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री 12 वाजता चार चोरट्यांनी पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करून 60 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले होते. तिघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पेट्रोल पंपावर रात्री पवन नारायण सोनवणे (वय 25, रा.गेंदालाल मिल) हा ड्यूटीवर होता. रात्री १२ वाजता गेंदालाल मिल येथील विक्की अडकमोल, अक्रम खान अय्युब खान, किरण बाविस्कर आणि समीर शेख हे चौघे मोटारसायकलने पंपावर आले. त्यांनी पेट्रोल मािगतले. या वेळी पवन हा पाणी िपत असल्यामुळे त्यांना थोडा वेळ थांबण्याचे सांिगतले. याचा राग आल्यामुळे चौघांनी पवनला मारहाण केली. याचदरम्यान पवनच्या गळ्यात असलेल्या चामडी पिशवीतील 60 हजार रुपये काढून घेतले.

पळून जाण्यासाठी पंपावरील एका स्टॅण्डपोस्टवर दगडफेक करून 30 हजार रुपयांचे नुकसान केले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात जबरी लूटसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्याम तरवाडकर तपास करीत आहेत.
पोलिसांनी रात्रीच तिघांना घेतले ताब्यात
ही घटना घडल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळाहून पलायन केले. त्यानंतर पवनने पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली. यातील अक्रम खान याला पवन चेहऱ्याने ओळखत होता. रात्रीच्या गस्तीवर असलेले गुन्हे शोध पथकाचे अमोल विसपुते, मिलिंद सोनवणे, प्रीतम पाटील आणि सुनील जाधव यांनी संशयावरून अक्रम शेख याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत किरण बाविस्कर व समीर शेख यांची घरे दाखवली. या ितघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर विक्की अडकमोल अद्याप बेपत्ता आहे.