आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज भरून घ्या पेट्रोल-डिझेल, उद्या महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स संघटनेचा बेमुदत बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -महाराष्ट्रातइतर राज्यांच्या तुलनेत कर अधिक असल्याने वाहनधारक शेजारील राज्यांतून पेट्रोल डिझेल खरेदी करतात. त्यामुळे पेट्रोल पंपधारकांना दरराेज तोटासहन करावा लागत आहे. हा कर कमी करण्यासाठी महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स संघटनेने राज्य शासनाकडे अनेक वेळा मागणी केली आहे. तसेच त्यासाठी ११ आॅगस्टला एकदिवसीय बंदही पुकारला होता. मात्र, तरीही राज्य शासनाने मागणी मान्य केल्यामुळे मंगळवारपासून पेट्रोलपंप बेमुदत बंद ठेवण्याचा िनर्णय संघटनेने घेतला आहे. त्यामुळे नागिरकानी गैरसोय टाळण्यासाठी आज पेट्रोल, डिझेल भरून घेणे फायद्याचे ठरणार आहे.
यांच्यावर होतोय वाढीव करांचा परिणाम
इतरराज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात फक्त एसएससी, वॅट आणि एलबीटी करांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ते रुपयांनी जास्त आहेत. हा कर सर्वसामान्य वाहनधारकांकडून वसूल केला जात आहे. तसेच डिझेलच्या वाढीव दरामुळे वाहतूक आणि प्रवास खर्चही महाग झाला आहे. या दरवाढीचा परिणाम पेट्रोल पंपचालकांच्या व्यवसायावरही झाला आहे. त्यामुळे व्यवसायात ३० ते ४० टक्के घट झाली असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. दरातील तफावतीमुळे वाहनचालक शेजारच्या राज्यांतील पंपांवरून डिझेल भरतात. पर्यायाने त्याचा फटका शासकीय महसुलालाही बसतो. दर तफावतीचा सर्वाधिक फटका महापालिका क्षेत्रातील ९०० पेट्रोल पंपधारकांना बसत असल्याची माहितीही संघटनेने दिली आहे.
फक्तआपत्कालीन सेवाच सुरू राहणार
महाराष्ट्रपेट्रोल डीलर्स संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपाच्या काळात आपत्कालीन सेवांसाठी पेट्रोल डिझेलची विक्रीसुरू राहणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चौबे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. या काळात रुग्णवािहका, बस पाकहनिस विभागाच्या वाहनांसाठी आरक्षित साठा ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितेतले. या संपात जिल्‍हातील १५० आणि शहरातील २० पेट्रोल पंपचालक सहभागी होणार आहेत.
सरकार केवळ चर्चा करते
११ऑगस्टला एक दिवसीय संप केल्यानंतर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्य शासनाच्या मंत्र्यांनी आमच्याशी यादरम्यान ते वेळा केवळ चर्चा केली. निर्णय मात्र कोणताही घेतला नाही. त्यामुळे आमच्यावर आंदोलन तीव्र करण्याची वेळ आली आहे. प्रकाश चाैबे, िजल्हाध्यक्ष,महराष्ट्र पेट्रोल डीलर्स संघटना
या आहेत प्रमुख मागण्या
महाराष्ट्रपेट्रोल डीलर्स संघटनेने २६ आॅगस्टपासून ‘एक राज्य एक करा’चा दर, एसएससी कर रद्द करावा, वॅट कर तीन टक्के कमी करावा, एलबीटी कर रद्द िकंवा कमीत कमी एक टक्का करावा या मागण्यांसाठी हा राज्यव्यापी बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.