आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासनाचा कसला दिलासा? ही तर वाहनधारकांची फसवणूकच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ: केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात पेट्रोलचे दर साडेसात रुपयांनी वाढविले होते. यानंतर शनिवारपासून ते दोन रुपये लिटरप्रमाणे कमी करण्यात आले. मात्र, ही केवळ वाहनधारकांची फसवणूकच असल्याच्या प्रतिक्रिया शहरातील वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे. आधी साडेसात रुपये वाढवून नंतर दोन रुपये कमी करणे हा दिलासा नसून छळवाद असल्याचे पडसाद उमटत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने वाहनधारकांना दिलासा म्हणून पेट्रोल कंपन्यांनी दोन रुपये दरकपातीचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात मात्र 1 रुपया 68 पैसे एवढेच दर कमी होणार आहेत. 24 मे रोजी पेट्रोलचे दर वाढविण्यात आले होते. यानंतर एनडीएने भारत बंदचे आवाहन केले होते. शहरात या बंदला संमिर्श प्रतिसाद मिळाला होता. यानंतर शनिवारपासून दर कमी झाले. मात्र, हा दिलासा नसून वाहनधारकांची फसवणूकच असल्याची शहरातील वाहनधारकांची भावना आहे. शहरातील प्रमुख पाच पेट्रोलपंपावर दररोज सरासरी 8 ते 10 हजार लिटर पेट्रोलची विक्री करण्यात येते. नोकरदारांचे शहर असल्याने महिन्याच्या पहिल्या तारखेपासून थेट 10 तारखेपर्यंत पेट्रोलची विक्री जास्त होते. वेतन मिळाल्यावर काही वाहनधारक महिन्याभराचे पेट्रोल एकदम भरतात. दरम्यान, दोन रुपये कमी झाले मात्र त्यातूनही वाहनधारकांना समाधान नसल्याच्याच प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. शहरातील जामनेर रोडवरील दोन आणि यावल रोडवरील तीन पेट्रोल पंपावर गर्दी उसळली होती.