आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 जानेवारीपासून फैजपुरात महोत्सवाचे आयोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-कॉलेजीयन सध्या सरावात गुंतले आहेत. आपल्याला जिंकायचेच आहे. या मनोवृत्तीने प्रत्येकाने कंबर कसली आहे. महाविद्यालयीन तरुणांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देणार्‍या युवामहोत्सवाची तरुणांमध्ये धूम आहे. या महोत्सवाच्या तयारीला उधाण आले आहे. येत्या 25 ते 28 जानेवारीदरम्यान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत फैजपूर येथे युवामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात तीन जिल्ह्यांतून तरुणांचा समावेश असतो. शहरातील महाविद्यालयातूनदेखील मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला जात आहे. एकू ण 22 प्रकारचे कलाप्रकार यात पाहायला मिळतात. वक्तृत्वापासून ते माइम, स्किट, पथनाट्य, लोकसंगीत, शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, वादविवाद, कोलाज, रांगोळी, पाश्चिमात्य नृत्य सारख्या कलाप्रकारांचा समावेश असतो. गेल्या एक महिन्यापासून तरुणांचा सराव सुरू असून हा अंतिम टप्प्यात आता पोहोचला आहे.

सरावासाठी चार ते पाच तास

जास्तीत जास्त पारितोषिके मिळवण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांचा सराव सुरू आहे. महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थ्यांचा एकत्रित संघ तयार करण्यात आला आहे. त्यानुसार चार ते पाच तास प्रत्येक जण आपल्या कलाप्रकाराचा सराव करीत आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींचा मिळून संघ या ठिकाणी सराव करीत आहे.

पथनाट्य लोकसंगीत, शास्त्रीय नृत्य, वादविवादसह होणार विविध स्पर्धा

पारंपरिकतेचे दर्शन

अनेक राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्‍न विद्यार्थ्यांद्वारे केला जात आहे. बेंडाळे महाविद्यालयातर्फे खान्देशी पारंपरिक संगीत हे लोकसंगीतात तर तामिळनाडूमधील महू हे लोकनृत्य आणि मंत्रिमंडळ नावाचे स्किट सादर करण्यात येणार आहे. आयएमआरतर्फे तामिळ भाषेतील कडघम हे नृत्य तसेच पर्यावरणावर आधारित स्किट तयार केले आहे. धनाजी नाना विद्याप्रबोधिनी समाजकार्य महाविद्यालयातर्फे ‘लायेंगे फिर राज सुनहरा लायेंगे’ हे समूह गायन होणार आहे. नूतन मराठा महाविद्यालयातर्फे क्रांती की मशाल हे समूह गायन तर ठाकर हे लोकनृत्य सादर केले जाईल. अशा विविध प्रकारच्या विषयांशी जुळलेल्या विषयांशी निगडीत प्रकार सादर केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांचा कल

लोकनृत्य आणि लोकगीत हे दोन मोठे कला प्रकार असतात. यात विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने खूप तयारी करावी लागते. पारंपरिकतेवर विद्यार्थ्यांचा कल असून विविध प्रकारच्या राज्यांची ओळख व्हावी, अशा पद्धतीचे नृत्य बसवण्यात येत आहे. हाफीज खान, नृत्य दिग्दर्शक
पथनाट्य, लोकसंगीत, शास्त्रीय नृत्य, वादविवादसह होणार विविध स्पर्धा