आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फार्मसीच्या विद्यार्थ्याची जळगावात रेल्वेखाली आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील मूळ रहिवाशी असलेल्या व साकेगाव येथील फार्मसी कॉलेजातील 22 वर्षीय तरुणाने पिंप्राळा रेल्वे पुलाजवळ आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. शिक्षणात मन लागत नसल्यामुळेच त्याने मृत्यूला कवटाळले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे. प्रवेश घेतल्यापासून त्याची कॉलेजात गैरहजेरी असल्याची माहिती पुढे येत आहे.

पुष्कर प्रवीण बर्‍हाटे (वय 22) असे मयताचे नाव आहे. तो नांदेड येथील मूळ रहिवासी व सध्या सिल्लोड येथे 20 वर्षांपासून नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या प्रवीण उर्फ किरण बर्‍हाटे यांचा मुलगा आहे. त्याचे वडील हे सिल्लोड येथील माणिकनगरातील सिध्देश्वर हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. इंजिनिअरींगची आवड नसल्याने ते शिक्षण सोडून सप्टेंबर 2012 मध्ये त्याने साकेगाव येथील कै . यशोदाबाई दगडू सराफ फार्मसी कॉलेजात बी फार्मसीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. प्रवेशानंतर महिनाभर तो कॉलेजजवळील घरात राहत होता. मात्र त्यानंतर ते घर बदलले होते. प्रवेश घेतल्यानंतर तो कॉलेजातही येत नव्हता. प्रथम सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी येत नसल्याने कॉलेजमधील कर्मचार्‍यांनी स्वत: फी भरून ऑनलाइन फॉर्म भरल्याची माहिती पुढे येत आहे. आतासुध्दा कॉलेजमधून दोन दिवसापासून त्याला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी येण्याचे निरोप दिले जात होते.

शुक्रवारी पहाटे 3 ते 8 वाजेदरम्यान पिंप्राळा रस्त्यावर असलेल्या महामार्गाच्या पुलाखाली डाउन लाइनवर खांब नंबर 417/24 ते 417/26 दरम्यान पुष्करचा मृतदेह आढळला. स्टेशन मास्तर अरुण देशमुख यांनी माहिती दिल्यावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

मुलांमध्ये संवाद गरजेचा
करीअर निवडतांना आपल्या पाल्याची क्षमता व आवड याचा विचार पालकांनी करायला हवा. विशिष्ट करीअरचा हेका लादणे चुकीचे आहे. मुले तणावाखाली असल्यास पालकांना हे ओळखता येवून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रय} करणे गरजेचे आहे.
-डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचारतज्ज्ञ