आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Philosophy Necessary For Progress Dr.Anil Kakodakar

प्रगतीसाठी तत्त्वज्ञानाशी समन्वय साधणे गरजेचे - डॉ.अनिल काकोडकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विज्ञान,तंत्रज्ञान आणि भारतातील हजारो वर्षांची परंपरा असलेले तत्त्वज्ञान यांचा समन्वय साधला गेला तर भारताच्या प्रगतीचा घोडदौड कोणालाच रोखता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ महाराष्ट्र राज्याच्या राजीव गांधी सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांनी केले.

उमवित यशोवल्लभ व्याख्यानमालेत डॉ. काकोडकर हे ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान’ या विषयावर बोलत होते. कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम अध्यक्षस्थानी होते. या वेळी मंचावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, अॅड. गिरीधरलाल गुजराथी, कुलसचिव प्रा.ए.एम. महाजन उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. मेश्राम यांनी एकविसाव्या शतकात कल्पना, नावीन्य सृजनशीलता यांना महत्त्व असल्यामुळे त्या दृष्टीने नव्यापिढीने विचार करावा. शाश्वत मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन यांनी प्रास्ताविक केले. अॅड. गिरीधरलाल गुजराथी यांनी व्याख्यानमाची भूमिका सांगितली. डॉ.आशुतोष पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ग्लोबल सस्टेनेबल बायोटेक काँग्रेस-२०१४ च्या शिफारस पुस्तिकेचे प्रकाशन झाले. प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी यासंदर्भात माहिती दिली. व्याख्यानाआधी डॉ.काकोडकर यांच्या हस्ते गणितशास्त्र प्रशाळा इमारतीचे (टप्पा-२) उद्घाटन झाले.