आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कॉलिंग अन् फेसबुक अपडेट टीव्हीवरूनही शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नवरात्रोत्सवानिमित्त विविध कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात आणल्या आहेत. कॅमेरा, मोबाइल फोन कॉलिंग, वायफाय कनेक्टिव्हिटी, व्हिडिओ चॅटिंग, स्पेशल नेटवर्कमुळे सहज कनेक्टिव्हिटी स्मार्टफोन अथवा टॅबलेटमध्ये असलेले फीचर्स आता चक्क टीव्हीमध्ये आले आहेत. विविध कंपन्यांनी मार्केटमध्ये टीव्हीमध्ये आणलेल्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये सोनीचा 4- के स्मार्ट टीव्ही ग्राहकांचे आकर्षण झाला आहे. हाय डेफिनेशनच्या चार पाऊले पुढे व्हर्जन असलेले एलईडी 4-के तंत्रज्ञान अधिक प्रभावी ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे इंटरनेट सर्फिंग, फेसबुक, टिवट्र अपडेट आणि युट्यूब डाऊनलोडदेखील घरातील भिंतींवर असलेल्या टीव्हीवर शक्य झाले आहे.

अँडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे टीव्हीला जोडण्यात आलेले स्मार्टफोन ऑप्शन अधिक प्रभावी ठरत आहे. विना केबल्समुळे सहज कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने युर्जस एलईडी स्क्रिनवरून कॉलिंग करू शकतात. फोनवर होणारी चर्चा टीव्ही स्पिकरवर संपूर्ण कुटुंब ऐकू शकते. टीव्ही रिमोटसह मोबाइलवरदेखील ऑपरेट करता येऊ शकतो.

अल्ट्रा हाय रेज्युलेशन : आतापर्यंत एचडी (हाय डेफिनेशन) हाच चर्चेचा मुद्दा होता; परंतु आता 4- के लेटेस्ट टेक्नॉलॉजी चर्चेत आहे. सोनीच्या एचडी स्क्रिनचे रेज्युलेशन 1920फ * 1080 फिक्सेल आहे. तर सोनीच्या 4-के या टेक्नॉलाजीच्या एलईडी ब्राविया टीव्हीचे रेज्युलेशन 3840* 2160 फिक्सेल आहेत. ते अल्ट्रा हाय डेफिनेशन आहे. एचडीपेक्षा चारपट अधिक प्रभावी असल्याने टीव्हीवर पिरला जिवंतपणा आल्याचा भास होतो. मूव्हमेंट अधिक शार्प झाली आहे.

ट्रिपल एक्सडी इंजन (स्किस्प पिक्चर क्वॉलिटी)
4-के एलईडी टीव्ही
0 कंपनी-सोनी, ब्राविया
0 फ्रेमलेस डिझाइन
0 ट्राइल्युमिनस डिस्प्ले.
0 4- के रेज्युलेशन (3840*2160 फिक्सल्स)
0 इमेज प्रोसेसिंग इंजन (ब्लू-रे डिक्स आणि लो- रिज्युलेशनलचे चांगले सादरीकरण)
0 11 भारतीय भाषांचे पर्याय
0 मॅग्नेटिक फ्युयल स्पीकर्स
0 बिल्ट इन वाय-फाय
0 सराउंड साउंड
0 स्मार्टफोनमुळे वायरलेस कनेक्टिव्हिटी
0 युट्यूब, फेसबुक, टिवट्र आणि स्काइप एक्सेस
0 मॉडेल उपलब्ध 55 आणि 65 इंचमध्ये.
0 किंमत 3.5 लाखांपासून पुढे.
0 युएसबी पोटर्स सराउंड साउंड

थ्रीडी फूल एचडी टीव्ही
47 इंच मॉडेल किंमत :1.15 लाख
चार एचडीएमआय आणि तीन बिल्ट इन वाय-फाय लॅन कनेक्टिव्हिटी
कंपनी - एलजी, फ्रेमलेस बॉडी
फूल एचडी (1920 * 1080 फिक्सेल)

नवीन फीचर्समुळे टीव्ही झाला अधिक स्मार्ट
0 फोर-के या तंत्रज्ञानाचे टीव्ही जळगावात दाखल
0 दसरा, दिवाळीसाठी ग्राहकांकडून होतेय चौकशी