आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमे-याने सगळा आनंद साठविता येतो क्लिकवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - सहलीचा आनंद साठवून ठेवायचा आहे?, लग्नाचे मूड टिपायचे आहेत?, निसर्ग छायाचित्रण करायचेय? नो प्रॉब्लेम. कारण आता एकापेक्षा एक सरस कॅमेरे बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सर्व आनंद एका क्लिकवर आला आहे. प्रोफेशनल फोटोग्राफीसह हौशी छायाचित्रणासाठी आवश्यक व सोपे असलेले कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत.
केवळ तीन ते दहा हजार रुपयांत कॅमेरे विकत मिळत असल्याने आता आनंदाची साठवणूक करणे सोपे होणार आहे. कॅनन, तोशिबा, सोनी, निकॉन आदी कंपन्यांचे अत्याधुनिक कॅमेरे विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. केवळ सुस्पष्टताच नव्हे तर लेन्सचा दर्जा, झूम इन, झूम आउट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेगा पिक्सलमुळे कॅमे-यांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे हौशी छायाचित्रकारांची संख्याही वाढताना दिसत आहे. सिंगल लेन्स रिफ्लेक्टर, प्रोफेशनल, 500 पासून 50,000 डीआय निकॉनचे कॅमेरे उपलब्ध आहेत. केवळ व्यावसायिक फोटोग्राफीसाठी ते वापरले जातात. याशिवाय टायमिंग, ब्लूट्युथ, वायफाय, इजी अ‍ॅक्सेस असलेले कॅमेरे हे केवळ दहा हजार रुपयांपर्यंत मिळत आहेत. दिवसागणिक जास्तीत जास्त मेगा पिक्सलमुळे छायाचित्रणाचे स्वरूप बदलत आहे. केवळ काही सेकंदात काढलेला फोटो आपल्याला डेव्हलप करून मिळू शकतो. याशिवाय मोठ्या स्क्रीनमुळे काढलेला फोटो तत्काळ पाहायला मिळतो. शर्टच्या खिशात मावतील असे कॅमेरे बाजारात आहेत. व्यावसायिक कॅमे-यांमध्येही मोठी रेंज बाजारात आहे. दोन जीबी ते 32 जीबी मेमरी कार्डही या कॅमे-याला सपोर्ट करीत असतात. याशिवाय विविध कंपन्यांच्या लेन्सेसही अटॅच करण्याची सुविधा या कॅमे-यांमध्ये आहे. सारे काही ऑटोमेटिक असल्याने कमी प्रकाशातही चांगले छायाचित्र या कॅमे-यांमधून काढता येते.