आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रकाराची आत्महत्या शवविच्छेदनानंतर मृतदेह नेण्यास नातेवाइकांचा नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पोलिसठाण्याची पायरी चढावी लागल्याने समाजात बदनामी झाल्याचे शल्य उराशी बाळगून रेल्वेखाली आत्महत्या करणारे छायाचित्रकार सुनील पंडितराव सोनवणे यांचा मृतदेह उचलण्यास रविवारी नातेवाइकांनी नकार दिला.
विनयभंगाचा आरोप असलेल्या तरुणाने जिल्हा रुग्णालयातून पोबारा केला आहे. त्यामुळे आत्महत्येस उद्युक्त करणाऱ्या दोषींना अटक करा, अशी मागणी करत सोनवणेंचे नातेवाईक आणि महिला सुरक्षा समिती सदस्यांनी जिल्हा रग्णालयात सुमारे दोन तास ठिय्या मांडला. अखेर दोषींना अटक करण्याचे आश्वासन जिल्हापेठ पोलिसांनी दिल्यानंतर सुनील सोनवणेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पिंप्राळा परिसरातील मुक्ताईनगरचे रहिवासी सुनील सोनवणे (वय 50) यांनी शनिवारी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. त्यांच्या शेजारी राहणारा तरुण कुणाल हेमंत साळुंखे याच्याशी खटका उडाल्यानंतर सोनवणे आणि कुणाल यांनी शुक्रवारी परस्परांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. आयुष्यात प्रथमच पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागल्याचे शल्य सोनवणेंच्या मनात बोचत होते. त्यामुळे त्यांनी शनिवारी दुपारी िप्रंपाळा उड्डाणपुलाजवळ रेल्वेखाली जीव दिला. त्यांच्या आत्महत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली. रविवारी सकाळी वाजता शवविच्छेदन करण्यासाठी सोनवणेंचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला होता. त्या वेळी नातेवाइकांसोबतच महिला सुरक्षा समितीच्या सदस्याही दाखल झाल्या. शवविच्छेदनानंतर नातेवाईक आणि महिला सुरक्षा समिती सदस्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. आत्महत्येस उद्युक्त करणाऱ्या कुणाल साळुंखेला अटक करण्याची मागणी त्यांनी या वेळी लावून धरली. तब्बल दोन तास हा गोंधळ सुरू होता. अखेर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आश्वासन दिले. या वेळी काही नातेवाइकांनीही आधी अंत्यसंस्कार महत्त्वाचे असल्याचे सांगून सामंजस्याची भूमिका घेतली. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सायली आणि रुपाली या दोन्ही मुलींनी आपल्या पित्याच्या पार्थिवास अग्निडाग दिला.
पित्याला अग्निडाग देताना दोघी मुली. पार्थिव उलचल्यास नकार दिल्यानंतर साेनवणे यांच्या नातेवाइकाचीं समजूत काढताना पोलिस निरिक्षक भाऊसाहेब पटारे.
असे आहे प्रकरण : सोनवणे आणि साळुंखे यांच्यातील कौटुंबिक वाद टोकाला जाण्यामागे इतरही कारणे आहेत. शुक्रवारी किरकोळ भांडणातून कुणाल यास मारहाण झाली होती. त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी परस्परांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या. या तक्रारींमध्ये कुणालविरोधात छेडछाड विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. यादरम्यान, कुणाल उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. इकडे सोनवणे यांनी आत्महत्या केल्यानंतर भीतीपोटी कुणाल रुग्णालयातून गायब झाला.