आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांच्या अादेशानेच उभारले फुले मार्केट, महापाैरांनी मांडली सचिवांकडे मनपाची बाजू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या वर्षभरापासून मालकी हक्कावरून गाजत असलेल्या फुले मार्केटची उभारणी ही ईस्ट खान्देशच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अादेशानेच केली हाेती. मार्केट बांधल्यास सनदेनुसार शर्तभंग ठरेल, असे म्हटले हाेेते. त्यामुळे १९५४मधील जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सनदेची पूर्ततेसाठी बांधलेले मार्केट हे अाताच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शर्तभंग कसे काय ठरतेय, असे पत्र देत महापाैर नितीन लढ्ढा यांनी महसूलच्या प्रधान सचिवांकडे बाजू मांडली अाहे.

फुले मार्केटच्या जागेवर बांधकाम केल्याप्रकरणी शर्तभंग झाला म्हणून जमीन शासन जमा करण्यासंदर्भात शासनस्तरावर सुनावणी प्रलंबित अाहे. याच संदर्भात महापाैर लढ्ढा यांनी दाेन पानी पत्र महसूल वनविभागाच्या प्रधान सचिवांना पाठवले अाहे. यात काही वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न केला अाहे. फुले मार्केटची जागा केव्हा कशी दिली, याचा उहापाेह करत दाेन जिल्हाधिकाऱ्यांच्या अादेशातील तफावतीवर प्रकाशझाेत टाकण्याचा प्रयत्न केला अाहे.

मार्केट बांधल्याने अाक्षेप
तत्कालीननगरपालिकेस बांधकाम परवानगी दिल्यानंतरही बऱ्याच कालावधीपर्यंत फुले मार्केट असलेल्या जागेचा विकास केला नव्हता. त्या जागेवर मार्केट बांधले नव्हते. त्यामुळे नगरपालिकेच्या शासकीय तपासणीत अाक्षेप नाेंदवण्यात अाले हाेते. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी (पूर्व खान्देश) यांनी म्युनिसिपालिटीच्या प्रेसिडेंट यांना फेब्रुवारी १९५४ला लिहिलेल्या पत्रात पक्के दुकाने बांधावी असे म्हटले अाहे.

बांधकामाला रितसर परवानगी
तत्कालीननगरपालिकेने फेब्रुवारी १९८८ राेजी ठराव क्रमांक ४६१नुसार मार्केटच्या बांधकामाचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव नगररचनाच्या नाशिक उपसंचालकांकडे परवानगीसाठी सादर केला हाेता. त्यानंतर २५ मे १९८८ राेजीच्या पत्रानुसार नकाशांना मंजुरी दिली हाेती. ती रितसर परवानगी घेऊनच व्यापारी संकुलाची उभारणी केल्याचे महापाैरांनी कागदपत्रांनुसार प्रधान सचिवांना कळवले अाहे.