आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग भगिनींनी कल्पकतेतून साकारल्या 21 हजार राख्या, आत्मविश्वास वाढावण्यासाठी उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- बहीणभावाच्या अतूट नात्याचं बंधन असणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणासाठी कल्पकतेतून २१ हजार सुबक राख्या बनवून दिव्यांग भगिनींनी बेराेजगारीवर मात केली. त्यांनी इतर बेराेेजगार तरुणांसमाेर हा अादर्श निर्माण करुन स्वयंराेजगाराचा मंत्र या कार्यातून दिला अाहे. या रोजगारातून दिव्यांगांना नवनिर्मितीचा आनंद मिळत असून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे.
 
दिव्यांगाच्या स्वावलंबनासाठी झटणाऱ्या शहरातील स्वयंदीप संस्थेतील २० मुलींकडून राख्या बनवल्या जात आहेत. गेल्या महिनाभरापासून राख्या बनवण्याचे हे काम सुरू अाहे. मीनाक्षी निकम भारती चौधरी यांच्या मार्गदर्शनाने गेल्या १५ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. स्वावलंबनासह दिव्यांगांच्या कल्पकतेचा विकास व्हावा, आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. २१ हजार राख्या बनवण्याचे उद्दिष्ट असून पैकी १३ हजारांच्या जवळपास राख्या विक्री देखील झाल्या आहेत. २० मुली या राख्या बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत. रेशीम दाेऱ्यात मणी ओवणे, फूल, चमकी लावणे आदी कामे या भगिनी करीत आहेत. या आकर्षक कलात्मक राख्याची किंमत १० रुपये ठेवण्यात आली असून शहरासह परिसरातील अनेक ठिकाणी राख्या विक्री केल्या जात आहेत.
 
उत्तम उदाहरण
दिव्यांगम्हटले की, आपल्यासमोर एक वेगळे चित्र उभे राहते. परंतु, दिव्यांग असूनही स्वावलंबनाचे एक उत्तम उदाहरण बघायला मिळत आहे. ज्योती पाटील, शारदा निकम, रुख्मा गायकवाड, कल्पना राठोड, कल्पना चौधरी, रंजना नन्नवरे, मनीषा देवरे, बबिता परमार, मंगल कोठावदे, वैशाली महाजन, भारती चौधरी आदींसह इतर स्वयंदिपच्या सदस्या या राख्या बनविण्याचे काम करीत आहेत.
 
रक्षा बंधनासाठीदिव्यांग मुलींनी खूप सुंदर राख्या बनवल्या आहेत. दिव्यांग भगिनी समाजात सक्षमपणे उभ्या राहत आहेत. आपली एक राखीची खरेदी माझ्या दिव्यांग मुलींचे आत्मबल वाढवेल, असा माझा विश्वास आहे.
- मीनाक्षी निकम, संचालिका, स्वंयदिप संस्था
 
बातम्या आणखी आहेत...